Crime  Saam Tv
क्राईम

Mumbai Crime : काका नराधम बनला, मुलीसमान पुतणीवर बलात्कार केला, चेंबूर हादरले

crime News in Mumbai : चेंबूरमध्ये मनाला हादरवून टाकणारी घटना घडली आहे. चुलत्याने शितपेयात गुंगीचे औषध टाकन मुलीसमान पुतणीवर अत्याचार केला. यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली.

Namdeo Kumbhar

सचिन गाड, साम टीव्ही प्रतिनिधी

Mumbai Crime News : मुंबईतील चेंबूरमध्ये मनाला हादरवून टाकणारी घटना उघडकीस आली आहे. चुलत्याने १५ वर्षीय मुलीला गुंगीचे औषध टाकून बलात्कार केला. चुलता इतक्या खालच्या स्तराला गेला की त्याने अत्याचाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला. चेंबूरमधील वाशीनाका परिसरात हा धक्कादायक प्रकार घडला. ही घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. नराधम चुलत्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

चेंबूरमध्ये १५ वर्षीय मुलीच्या शितपेयात गुंगिचं औषध टाकून बेशुद्धावस्थेत चुलत काकाने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आरोपीने बलात्काराचा व्हिडिओ व्हायरल केला. वाशीनाका चेंबूर येथील धक्कादायक प्रकार घडला. नराधम काकाला केली आरसीएफ पोलिसांनी अटक केली. या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम ६४(२)(१), ६५(१) आणि १२३ तसेच बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण (पॉक्सो) कायद्याच्या कलम ४,८ आणि १२ अंतर्गत गुन्हा दाखल करत बेड्या ठोकल्या. कपडे घेऊन देण्यासाठी पैसे देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीला मैत्रिणीच्या घरी बोलवले. त्यानंतर शितापेयात गुंगिकारक औषध पाजले. मुलगी बेशुद्ध असताना चुलत्याने बलात्कार केला. या प्रकारानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vivo T4 Pro भारतात लवकरच होणार लाँच, ५०MP कॅमेरा अन् खास फीचर्स, किंमत किती?

Weather Update : पावसाचा जोर वाढला! मुंबई, ठाणे, पुण्यासह अनेक जिल्ह्यांना अलर्ट जाहीर, वाचा आजचा हवामानाचा अंदाज

Maharashtra Live News Update: महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर

Budhaditya Rajyog: बुध ग्रहाच्या राशीत बनणार बुधादित्य राजयोग; 'या' राशींना गुंतवणूकीतून चांगला परतावा मिळणार

Sunday Horoscope : आपलं कोण अन् परकं कोण ओळखायला शिका; ५ राशींच्या लोकांना राहावे लागेल सावध, वाचा रविवारचं राशीभविष्य

SCROLL FOR NEXT