Mumbai to Thailand international drug trafficking racket busted saam tv
क्राईम

कुरकुरेच्या पाकिटमधून अमली पदार्थांची तस्करी; मुंबईहून थेट थायलंडला डिलिव्हरी, दोघांना अटक

Mumbai Crime: मुंबईत आंतरराष्ट्रीय अमली पदार्थ तस्करी करणाऱ्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केल्याचा दावा केलाय. १२ किलो ३९० ग्रॅम केटामाइन जप्त करण्यात आले असून त्याची किंमत ३७ कोटी १७ लाख रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Bharat Jadhav

  • मुंबईतून थायलंडला अमली पदार्थांची तस्करी

  • एमआयडीसी पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी पथकाने १२ किलो ३९० ग्रॅम केटामाइन जप्त केल्याची माहिती

  • या प्रकरणात दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

संजय गडदे, साम प्रतिनिधी

मुंबईतून आंतरराष्ट्रीय पातळीवर अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या टोळीचा एमआयडीसी पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी पथकाने पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी दोन आरोपींना अटक करून त्यांच्याकडून १२ किलो ३९० ग्रॅम केटामाइन अमली पदार्थ जप्त केला असून, त्याची किंमत तब्बल ३७ कोटी १७ लाख रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.

विशेष म्हणजे मुंबईच्या अंधेरी परिसरातून हे केटामईन ही वेफर्स, कुरकुरे यांच्या पाकीट मधून हे थायलंडला पाठवण्यात येत असे.यासाठी कॅरियर चा वापर केला जात असे. प्रत्येक वेळी यात महिला. करिअर चा वापर केला जात असे.यासाठी एका ट्रिपचे महिलेला लाखभर रुपये दिले जात असे.

एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या अमली पदार्थविरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक खोलम व त्यांच्या पथकाला अमली पदार्थांची विक्री करणाऱ्या इसमांविरोधात कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार २४ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री सुमारे ११ वाजता विमानतळ मेट्रो स्टेशनजवळ, माकीनाका येथे पोलिसांनी सापळा रचला.

कॅरियरसाठी विदेशात नोकरी मिळून देणाऱ्या कंपन्यांकडून डेटा गोळा केला जात असे. डेटा च्या मदतीने महिला कॅरीयर आरोपीच्या संपर्कात येत असे.आतापर्यंत या टोळीच्या माध्यमातून 2 महिलांना शोधण्यात आले होते. यावेळी दोन इसम संशयास्पदरीत्या फिरताना आढळून आले. पोलिसांना पाहून त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी पाठलाग करून दोघांना ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्यांच्या ताब्यात अमली पदार्थ असल्याचे निष्पन्न झाले. अधिक तपास केल्यानंतर हा पदार्थ ‘केटामाइन’ असल्याचे स्पष्ट झाले.

अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे अदनान अहमद नियाज अहमद सिद्दीकी (३५) आणि सौद मुस्ताक मागण्यार (२९) अशी आहेत. आरोपींकडून एकूण १२ किलो ३९० ग्रॅम केटामाइन, अंदाजे ३७ कोटी १७ लाख रुपये किमतीचे, जप्त करण्यात आले. पोलिसांच्या तपासात आरोपी हे केटामाइनची विक्री, वाहतूक व व्यापार करण्यासाठी मुंबईत आणत असल्याचे समोर आले आहे. तसेच या अमली पदार्थांची आंतरराष्ट्रीय पातळीवर तस्करी करणारी टोळी सक्रिय असल्याचे तपासात निष्पन्न झाले असून, मुंबई शहरातून खाद्यपदार्थांमध्ये लपवून केटामाइन थायलंड, इंडोनेशिया, म्यानमार, मलेशिया आदी देशांमध्ये पाठविले जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे.

या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात NDPS Act 1985 मधील कलम 8(क), 22(क) आणि 29 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, या आंतरराष्ट्रीय तस्करीच्या साखळीतील इतर आरोपींचा शोध घेण्यासाठी पुढील तपास सुरू आहे.पश्चिम परिमंडळ 3 चे DCP दत्ता नलावडे आणि एसीपी योगेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली घनश्याम नायर, व.पो. नी एम आय डी सी, पोलीस निरीक्षक गुन्हे सुनील करंडे पोलीस निरीक्षक योगेश तांदळे प्रशासन यांच्या प्रत्यक्ष देखरेखी खाली सपोनि खोलम पोलीस हवालदार गौतम बडे पोलीस हवलदार बाबू येडगे पोलीस हवालदार सचिन ठोंबरे पोलीस शिपाई बीनल शिंगाने यांच्या पथकाने केलेल्या या कारवाईमुळे मोठ्या प्रमाणातील केटामाइनची तस्करी रोखण्यात पोलिसांना यश आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: काँग्रेस नेत्या माजी मंत्री यशोमती ठाकूर यांच्या निवासस्थानावरून संशयास्पद ड्रोनच्या घिरट्या

Mumbai Manhole News : मॅनहोलमध्ये पडून कामगाराचा मृत्यू; नेमकं काय घडलं? पाहा VIDEO

Sleeping : झोपताना अचानक खाली पडल्यासारखं वाटतं? यामागे असू शकतं 'हे' गंभीर कारण

रोज अति प्रमाणात भात खाणे पडू शकते महागात; जाणून घ्या शरीरावर होणारे 5 दुष्परिणाम

चार महिन्यात लागणार पक्ष आणि निवडणूक चिन्हाच्या वादाचा निकाल; सुप्रीम कोर्टाचा नवा आदेश

SCROLL FOR NEXT