Mumbai Crime News Saam TV
क्राईम

Mumbai Crime News: गर्लफ्रेंडने शॉपिंगसाठी 1 लाख मागितले; टेंन्शनमध्ये तरुणाने थेट जीवनच संपवलं

Powai Crime News: पवई पोलीस स्टेशन हद्दीत राहणाऱ्या या तरुणाने 1 नोव्हेंबर रोजी आपलं जीवन संपवलं. आपल्या मुलाने अचानक एवढं टोकाचं पाऊल का उचललं या विचाराने त्याचे आई वडील त्रस्त होते.

साम टिव्ही ब्युरो

Crime News:

आपलं खरं प्रेम मिळवण्यासाठी अनेक तरुण तरुणी कुटुंबीयांशी भांडतात आणि प्रेम मिळवतात. प्रेमामध्ये आजवर अनेकांनी आत्महत्या देखील केली आहे. अशात मुंबईमधून एक डोकं चक्रवणारी घटना समोर आलीय. प्रेयसीने शॉपिंगसाठी 1 लाख रुपये मागितल्याने बॉयफ्रेंडने आत्महत्या केली आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मुंबईच्या पवई परिसरात ही घटना घडली आहे. प्रथम असं 20 वर्षीय आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव आहे. पवई पोलीस स्टेशन हद्दीत राहणाऱ्या या तरुणाने 1 नोव्हेंबर रोजी आपलं जीवन संपवलं. आपल्या मुलाने अचानक एवढं टोकाचं पाऊल का उचललं या विचाराने त्याचे आई वडील त्रस्त होते.

मुलाच्या निधनाने त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला होता. अशात मुलाच्या मित्राने आता त्याच्या आत्महत्येमागचे कारण सांगितले आहे. प्रथमच्या मित्राने त्याच्या वडिलांची भेट घेतली. तसेच प्रथामच्या गर्लफ्रेंडबाबत सांगितले. तरुणी प्रथमला सतत त्रास देत होती. तिने त्याच्याकडे शॉपिंगसाठी 1 लाख रुपये मागितले होते. एव्हढी मोठी रक्कम कुठून आणायची यामुळे तो चिंतेत होता. पैसे न दिल्याने ती त्याला सतत त्रास द्यायची. त्यामुळे त्याने जीवन संपवण्याचा निर्णय घेतला असावा, असं मित्राने सांगितलं.

वडिलांना ही माहिती समजताच त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. तसेच तरुणीविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तपासात प्रथमचा फोन तपासला. त्यावेळी यात त्या दोघांची चॅट पोलिसांना सापडली. त्यामुळे मुलाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी तिच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तरुणीला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. पोलीस या प्रकरणी आणखी तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heart blockage: हार्ट ब्लॉकेज असल्यास शरीरात दिसतात हे ६ मोठे बदल

मेट्रो अधिकाऱ्याच्या कृत्याने मुंबई हादरली; इंजिनीअर असलेल्या महिलेवर ऑफिसमध्येच अत्याचार

Maharashtra News Live Update: मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील चांदी वाहून नेणारी व्हॅन उलटली

ठाणे हादरलं! गर्लफ्रेंडने बॉयफ्रेंडला संपवलं, नंतर मृतदेह हिरव्या ड्रममध्ये भरून नाल्यात फेकला

CNG, पेट्रोल-डिझेलच्या किंमती भडकल्या, घरगुती गॅस सिलिंडरचे दरही वाढणार?

SCROLL FOR NEXT