Acid attack By Husband On Wife And Son Saam Tv
क्राईम

Mumbai News: भयंकर! घटस्फोटाचा राग, बायको अन् मुलावर अॅसिड फेकलं; तरुणाच्या कृत्याने मुंबईत खळबळ

Acid attack By Husband On Wife And Son: मु्ंबईमध्ये नवऱ्याने बायको अन् मुलावर अॅसिड हल्ला केल्याची घटना समोर आलीय. पोलिसांनी याप्रकरणी आरोपीला अटक केली आहे.

Rohini Gudaghe

सचिन गाड, साम टीव्ही मुंबई

मुंबईमध्ये एका नवऱ्याने बायको आणि मुलावर अॅसिड हल्ला केल्याची घटना घडली आहे. मनाविरुद्ध घटस्फोट दिल्याच्या रागातून ॲसिड हल्ला केल्याची माहिती मिळत पोलिसांनी दिली आहे. ही घटना वांद्रे पूर्व येथून समोर आलीय. या घटनेमध्ये महिला आणि मुलगा गंभीर जखमी झालेत, सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. आपण या घटनेबद्दल सविस्तर जाणून घेवू या.

नक्की काय घडलं?

पती इशरत शेख याला पत्नी अंजुम शेख सोबत राहायचं होतं. परंतु पत्नीने त्याला त्याच्या इच्छेविरूद्ध घटस्फोट दिला होता. याचाच राग इशरत शेख याच्या मनात होता. त्यामुळे त्याने पत्नी आणि मुलगा (Mumbai Crime News) त्यांच्या घरात असताना दोघांवर ॲसिड फेकलं. हा हल्ला केल्यानंतर पती फरार झाला होता. त्याला पोलिसांनी काल २३ जुलै रोजी रात्रीच्या सुमारास पकडलं आहे.

बायको आणि मुलावर अॅसिड हल्ला

अॅसिड हल्ल्यात जखमी झालेले अंजुम शेख आणि मुलगा रईस शेख यांना कस्तुरबा रुग्णालयात भरती करण्यात आलं होतं. आरोपी पतीला निर्मल नगर पोलिसांनी अटक केलीय. बायकोच्या पाठीवर पोटावर आणि हातावर ॲसिड पडलं (Acid attack) होतं, तर मुलाच्या पाठीवर ॲसिड पडलं होतं. दोघंही सध्या आऊट ऑफ डेंजर असल्याची माहिती पोलिसांनी दिलीय.

पोलिसांनी आवळल्या मुसक्या

बायको अंजुम कॅटरिंगचं काम करते, तर पती इशरत चालक (Mumbai News) आहे. त्याला अंजुमसोबत राहायचं होतं. मात्र, तिने त्याला घटस्फोट दिल्याने संतापाच्या भरात त्याने हल्ला केला होता. त्याने बायको आणि मुलावर रेड ऑक्साईड फेकल्याचं समोर आलंय. रेड ऑक्साईड लोखंड गंजू नये म्हणून वापरलं जातं, या घटनेमुळे वांद्रे पूर्व परिसरात मोठी खळबळ उडाली (Crime News) होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Weight Loss Recipe : भात खाऊनही वजन होईल कमी, वाचा 'ही' पुलावची हेल्दी रेसिपी

Maharashtra News Live Update: पत्रकाराची गळफास घेऊन आत्महत्या

IPL 2026 : KKR च्या युवा फलंदाजावर बीसीसीआयची मोठी कारवाई, रागाच्या भरात केलेलं कृत्य भोवलं

पीडितेचं नाव बदललं, मलेशियाला पाठवण्याचा डाव, TCS धर्मांतर प्रकरणाचं मालेगाव कनेक्शन आलं समोर

Bhau Kadam: एकांकिकेत काम करणाऱ्या मुलीची बहिण आवडली, हटके स्टाईल केलं प्रपोज; भाऊ कदमची फिल्मी लव्हस्टोरी

SCROLL FOR NEXT