मुंबईमधून एक धक्कादायक घटना समोर आलीय. ६० वर्षीय महिलेने इमारतीच्या ९व्या मजल्यावरुन उडी मारुन आपले जीवन सपंवले आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून, याबाबतचा अधिक तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
मिळालेल्या माहितीनुसार, राजधानी मुंबईतील कांदिवलीमध्ये सोमवार (ता. ८) ही घटना घडली. मंगला राठोड असे आत्महत्या केलेल्या वयोवृद्ध महिलेचे नाव आहे. ही महिला पती, तीन मुले आणि सुनेसह कांदिवली परीसरात वास्तव्यास होती.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेतली. त्यानंतर समतानगर पोलिसांनी वृद्ध महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी नजीकच्या रुग्णालयात पाठवला आहे. आत्महत्येचे कारण अद्याप समजले नसून, या घटनेची नोंद पोलिसांनी घेतली असून, पुढील तपास सुरू आहे.
आत्महत्येच्या घटनांमध्ये वाढ
महाराष्ट्रात आत्महत्येच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. कालच शिवडी येथील २६ वर्षीय तरुणाने इमारतीच्या २१व्या मजल्यावरुन उडी मारुन आपले जीवन सपंवले होते. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या अपघाती मृत्यू आणि भारतातील आत्महत्या २०२०च्या अहवालानुसार, महाराष्ट्रात २०२२ मध्ये विविध कारणांमुळे आत्महत्यांच्या ८४ घटनांची नोंद झाली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.