Mumbai Crime Saam Tv
क्राईम

Mumbai Crime: बाप बनला हैवान! पोटच्या १३ वर्षांच्या मुलीवर बलात्कार, ८ महिन्यांची गरोदर

Govandi Crime News: मुंबईतल्या गोवंडीमध्ये १३ वर्षीय मुलीवर बापाने लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली. मुलगी ८ महिन्यांची गरोदर राहिली. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी आरोपी बापाला अटक केली.

Priya More

बापानेच आपल्या पोटच्या मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना मुंबईमध्ये घडली आहे. पीडित तरुणी ८ महिन्यांची गरदोर राहिली आहे. मुंबईतल्या गोवंडी परिसरात ही धक्कादायक घटना घडली. या घटनमुळे मुंबई हादरली आहे. या प्रकरणी नराधम बापाला शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली.

मिळालेल्या माहितीनुसार, बापाने आपल्या १३ वर्षीय पोटच्या मुलीवर बलात्कार केला. मुलगी ८ महिन्यांची गरोदर राहिली आहे. बलात्काराची वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. त्यामुळे पीडित मुलीने कुणालाही सांगितले नाही. पण पोटात दुखत असल्यामुळे मुलीला रुग्णालयात नेले असता हा धक्कादायक प्रकार समोर आला.

याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी ३६ वर्षीय नराधम बापाविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली. या प्रकरणाचा पोलिस तपास करत आहेत. भारतीय न्याय संहिता कलम ६४ (२)(एफ), ६४(२) (एच), ६४ (२) (आय), ६४ (२) (एम), ३५१ (३) आणि ६९ सह बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण (पॉक्सो) कायद्याच्या कलम ४, ६, ८, १२ अंतर्गत आरोपीला अटक करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime: रमजानच्या महिन्यात पुणे हादरलं! किरकोळ वादानंतर ६ जणांनी फैसलच्या छाती, पाठीत भोसकला चाकू, CCTV Video व्हायरल

Crime: पाणी वाया का घालवतो? जाब विचारल्याने तरुणाची सटकली; सुरक्षारक्षकाला जागीच संपवलं

Maharashtra Live News Update: दारव्हा कारंजा मार्गावरील टोलनाक्यावर काॅग्रेसची धडक

Heart Attack Symptoms: हार्ट अटॅक येण्याच्या 24 ते 48 तास आधी शरीराकडून नेमके कोणते संकेत मिळतात?

चुलीवर स्वयंपाक करताना आईला मिठी मारली; उकळते दूध अंगावर पडून २ वर्षांच्या मुलाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT