Solapur Crime saam Tv
क्राईम

Crime News: मुंबई क्राईम ब्रँचकडून सोलापुरातील ड्रग्ज बनवणाऱ्या कारखान्याचा पर्दाफाश; १०० कोटी रुपयांचे साहित्य जप्त

Solapur Crime: मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या युनिटने सोलापूरमधील ड्रग्जचा कारखाना उद्धवस्त केलाय

Bharat Jadhav

Mumbai Crime Branch :

मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या युनिट-९ ने सोलापूर जिल्ह्यातील ड्रग्ज बनवणाऱ्या कारखान्याचा पर्दाफाश केलाय. पोलिसांनी ड्रग्ज उत्पादन करणारे साहित्य जप्त केले. या साहित्याची बाजारात १०० कोटी रुपयांपेक्षा जास्त किमत असल्याची माहिती पोलिसांनी दिलीय. (Latest News)

मिड डे या वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट-९ चे निरीक्षक दया नायक यांना शहरातील वांद्रे पश्चिम आणि खार भागात ड्रग्ज तस्कर सक्रिय असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार दया नायक यांनी या प्रकरणी अधिक तपास केला. यासाठी त्यांनी गुन्हे शाखा युनिट-९ मधील पोलीस अधिकाऱ्यांचे विशेष पथक तयार केले. खार पश्चिम भागातील कार्टर रोड येथे काही ड्रग्ज पेडलर सक्रिय असल्याचे आढळून आले.

या गुन्हेगारांना पकडण्यासाठी सापळा रचण्यात आला आणि त्यांना . घटनास्थळावरून दोन संशयितांना पकडण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी सांगितले की, पकडण्यात आलेल्या संशयितांचे वय अनुक्रमे ३२ आणि २७ आहे. यांच्याकडून मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ जप्त करण्यात आले. एका संशयिताकडून २.५४७ किलो मेफेड्रोन (MD) ड्रग्ज जप्त करण्यात आले. त्याची बाजारात किमत ५.९ कोटी रुपये आहे. तर दुसऱ्या संशयिताकडून ५.८ किलो वजनी ५.८ कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे ड्रग्ज जप्त करण्यात आले.

दरम्यान या संशयितांच्या चौकशीदरम्यान पोलीस अधिकार्‍यांच्या पथकाला सोलापूर जिल्ह्यातील चिंचोली एमआयडीसी परिसरात ड्रग्ज निर्मितीचा कारखाना सुरू असल्याचे आढळून आले. दया नायक यांच्या नेतृत्वाखालील पथकाने कारखान्यावर छापा टाकला. ड्रग्ज तयार करणारी उपकरणे, कच्चा माल आणि ड्रग्ज सापडली. पोलीस अधिकार्‍यांनी संपूर्ण ऑपरेशनमध्ये एकूण १०० कोटीहून अधिक रुपयांचे साहित्य जप्त केलस आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मध्यरात्री मोठा राजकीय भूकंप; माजी मुख्यमंत्र्यांच्या चुलत भावाचा भाजपमध्ये प्रवेश

समान नागरी कायद्यावरून एनडीएमध्ये वादंग; भाजपच्या मित्रपक्षांचा विरोध

Manoj Jarange: जरांगेंचा तिसऱ्यांदा परवानगीसाठी अर्ज; पोलिसांनी घातलेल्या अटीही मान्य, आंदोलनाला परवानगी मिळणार का?

गाडीवर आमदार नावाचं स्टिकर लावून मिरवणाऱ्या कार्यकर्त्यांना दणका; 'राजकीय पॉवर' दाखवणाऱ्यांचा पोलीस उतरवणार माज

आशिया कप अवॉर्ड सेरेमनीत हायहोल्टेज ड्रामा, पाकच्या मोहसीन नक्वींकडून ट्रॉफी घेण्यास नकार

SCROLL FOR NEXT