Crime News  Saam Tv
क्राईम

Crime News: हात-पाय बांधले, तोंडात बोळा कोंबला...; १३ वर्षीय मुलीवर ५ जणांचा सामूहिक बलात्कार

Assault case india: लखनऊमध्ये 13 वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी तातडीने कारवाई करत तपास सुरू केला असून पीडितेवर उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त केला जात आहे.

Surabhi Jayashree Jagdish

उत्तर प्रदेशच्या राजधानी लखनऊमध्ये एक धक्कादायक आणि मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. आशियाना पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या सेक्टर-एम भागात एका बांधकाम सुरू असलेल्या बिल्डिंगमध्ये १३ वर्षांच्या मुलीवर पाच मजुरांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी जवळ असलेल्या घरात लहान मुलांना सांभाळण्याच काम करत होती. ती नेहमीप्रमाणे कामावर जात होती आणि अचानक पाऊस आला. पावसात भिजू नये म्हणून तिने बाजूलाच सुरु असलेल्या इमारतीत थांबण्याचा निर्णय घेतला. यावेळी तिथे काम करत असलेल्या एका मजुराने तिला आत ओढलं.

यावेळी त्या मजूराचे साथीदार बाहेर पहारा देत होते. मुलीने विरोध केला असता तिचे हात-पाय बांधून तिला मारहाण करण्यात आली. इतकंच नाही तर तिच्या तोंडात कापडाला बोळा कोंबला आणि पाच जणांनी तिच्यावर सामुहिक बलात्कार केला.

आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश

ज्या घरात मुलगी लहान मुलांना सांभाळण्याचं काम करत होती त्या घरातील महिलेने ती वेळेवर न आल्याने शोधाशोध सुरू केला. यावेळी मुलीचा भाऊही शोध घेत असताना घटनास्थळी पोहोचला. त्याला पाहून आरोपी पळू लागले. दोन आरोपी छतावरून उडी मारून पळून जात असताना जखमी झाले. या घटनदरम्यान इतका आरडाओरडा झाला ते ऐकून स्थानिक लोकही जमा झाले आणि पाचही आरोपींना पकडून पोलिसांच्या हवाली केलं.

पोलिसांची मोठी कारवाई

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि सर्व आरोपींना ताब्यात घेतलं. पीडित मुलीला तातडीने लोकबंधु रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून तिची वैद्यकीय तपासणी झाली आहे. डीसीपी यांनी या घटनेत बलात्कार झाल्याची माहिती दिली आहे. दरम्यान याबाबत पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे. तर पाचही आरोपींना चौकशीसाठी पोलीस कोठडीत ठेवण्यात आलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Main Door Vastu Tips: घराच्या दरवाज्याविषयी 5 महत्वाच्या गोष्टी प्रत्येकाला माहित असायला हव्यात

Maharashtra News Live Update: नांदणी मठाची माधुरी हत्ती नांदणी मठाकडे येण्याचा मार्ग मोकळा

Ganesh Chaturthi 2026: यंदा गणपती बाप्पांचं आगमन ठरणार विशेष; हरतालिका आणि गणेश चतुर्थी एकाच दिवशी, जाणून घ्या पुजेचा मुहूर्त

Railway News : केंद्र सरकारचा मोठा निर्णय! मुंबईसह ७ हाय-डेंसिटी कॉरिडॉरच्या चौपदरीकरणाला मंजुरी

Face Care: चेहऱ्यावर वारंवार दिसतात व्हाइटहेड्स? डॉक्टरांनी सांगितलेले सोपे उपाय नक्की करुन बघा, ५ दिवसात दिसेल फरक

SCROLL FOR NEXT