Ambarnath crime Saam Tv
क्राईम

Crime News: वाटेत आडवा आल्याने हटकलं, माजी नगरसेविकेच्या मुलीला शिवीगाळ; तरुणावर कार्यकर्त्यांकडून जीवघेणा हल्ला; VIDEO व्हायरल

Ambarnath Crime: अंबरनाथमध्ये किरकोळ वादातून दोन गटात तुफान राडा झाला. एका तरुणावर धारधार शस्त्राने जीवघेणा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Priya More

अजय दुधाणे, अंबरनाथ

अंबरनाथमध्ये किरकोळ वादातून दोन गट भिडल्याची घटना घडली. गाडी चालवताना मध्ये आलेल्या तरुणाला हटकल्याने त्याने माजी नगरसेविकेच्या मुलीला शिवीगाळ केली. त्यामुळं माजी नगरसेविकेच्या समर्थकांनी शिवीगाळ करणाऱ्या तरुणावर जीवघेणा हल्ला केला. या तरुणावर धारदार शस्त्राने वार केले. यानंतर संतापलेल्या जमावाने तरुणावर जीवघेणा हल्ला करणाऱ्या तरुणांना चोप दिली आणि माजी नगरसेविकेच्या घरावर दगडफेक केली. अंबरनाथच्या बारकूपाडा परिसरात ही घटना घडली. या घटनेनंतर या परिसरात तणावपूर्ण वातावरण आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अंबरनाथच्या बारकूपाडा परिसरात राहणाऱ्या माजी नगरसेविका अनिता भोईर यांची मुलगी अबोली ही शुक्रवारी सायंकाळी कोर्टातून घरी येत होती. फासेपारधी समाजातील एक तरुण रस्त्यावर आडवा चालत जात होता. त्यामुळे अबोलीने या तरुणाला बाजूला होण्यासाठी तीन वेळा गाडीचा हॉर्न वाजवला. मात्र हा तरुण बाजूला न झाल्यामुळे अबोलीने त्याला हटकलं असता त्यांच्यात शाब्दिक वाद होऊन या तरुणाने अबोलीला शिवीगाळ केली.

अबोलीला शिवीगाळ केल्याचे समजताच अनिता भोईर यांचे समर्थक असलेल्या दोन तरुणांनी शिवीगाळ करणाऱ्या फासेपारधी तरुणावर धारदार शस्त्राने वार केले. तरुणावर वार करून पळून जाणाऱ्या तरुणांना फासेपारधी समाजाने घेराव घालत चोप दिला. तसंच त्यांचा पाठलाग करत थेट अनिता भोईर यांच्या घरावर दगडफेक केली. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण आहे.

या सगळ्या घटनेनंतर फासेपारधी समाजातील जखमी तरुण राजा घोरपडेला उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. तर शिवाजीनगर पोलिसांनी बारकू पाडा परिसरात धाव घेत मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला असून याप्रकरणी अंबरनाथच्या शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Smoking and voice change: सिगारेट ओढल्याने आवाज घोगरा होतो? जाणून घ्या दाव्यामागील सत्य

Maharashtra News Live Update: नसरापूर अत्याचार आणि खून प्रकरण, ४ दिवसात दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले जाणार

CNG भरण्याची 'ही' आहे योग्य वेळ, फुल प्रेशरमुळे वाचतील पैसे अन् वाढेल गाडीचे मायलेज

Petrol Diesel Rate: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी पेट्रोल डिझेल महागलं की स्वस्त झालं? वाचा मुंबई पुण्यासह तुमच्या शहरातील दर

Famous Marathi Singer Death:सुगम संगीताचा सुवर्णकाळ संपला; ज्येष्ठ मराठी गायक काळाच्या पडद्याआड, संगीत विश्वावर शोककळा

SCROLL FOR NEXT