Nagar Manmad Highway  
क्राईम

कोयते, कुऱ्हाडी, मिरचीची पूड घेऊन दरोडा टाकण्याच्या तयारीत, पोलिसांनी दहा जणांच्या मुसक्या आवळल्या

Nagar Manmad Highway Crime: एमआयडीसी पोलिसांनी दरोड्याच्या तयारीत असलेल्या दहा जणांच्या टोळीला ताब्यात घेतले. या कारवाईत पोलिसांनी ३ लाख ५८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

Dhanshri Shintre

सुशील थोरात/साम टीव्ही न्यूज

एमआयडीसी पोलिसांनी दरोड्याच्या तयारीत असलेल्या दहा जणांच्या टोळीला ताब्यात घेतले आहे. या टोळीकडून ३ लाख ५८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. १७ मार्च रोजी १०.३० च्या सुमारास, सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांना एक गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार, नगर मनमाड महामार्गावरील वेळ परिसरातील चौधरी हॉटेल समोर अंधारात काही तरुण मोटरसायकलवर हत्यारांसह थांबले होते.

ही माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांनी आपल्या पोलीस कर्मचाऱ्यांसह मिळालेल्या माहितीच्या ठिकाणी जाऊन छापा टाकला असता विळद घाट परिसरातील तळ्याच्या कडेला काही मोटरसायकल उभ्या करुन रोडवरील पत्र्याचे दुकानाचे मागील बाजुस काही इसम दबा धरुन बसल्याचे पोलीसांना दिसले. पोलिसांनी त्यांना विचारपूस करण्यास सुरुवात करताच त्यांच्यातील दोन जण आंध्राचा फायदा घेऊन पळून जात असताना पोलिसांनी त्यांना पाठलाग करून पकडले व इतर आठ जणांना ताब्यात घेतले.

ताब्यात घेतलेले संशयित इसम १) मयुर पोपट बोरुडे वय २४ वर्षे रा. आठरे पाटील स्कुल जवळ शेवाळे मळा अ.नगर २) संकेत विजय वारस्कर वय २४ वर्षे रा. सिद्धार्थ नगर अ.नगर ३) ऋतिक रमेश शिंदे वय २४ वर्षे रा. सिद्धार्थ नगर अ.नगर ४) संतोष राम घोडके वय २४ वर्ष रा. सिद्धार्थनगर अ.नगर ५) अनिल वसंत घोरपडे वय २६ वर्षे रा. भुतकरवाडी अ.नगर ६) अनिकेत अनिल गायकवाड रा. सिद्धार्थनगर अ.नगर ७) ऋषिकेश राजु पाटोळे वय २५ वर्षे रा. सिध्दार्थनगर अ.नगर ८) शिवम अनिल झेंडे वय २४ वर्षे रा. सिद्धार्थनगर अ.नगर ९) अजय राजेश गायकवाड वय २२ वर्षे रा. भुतकरवाडी अ.नगर १०) रोहित वाळु अटक वय २४ वर्षे रा. सिद्धार्थनगर अ.नगर असे असून त्यांच्याकडून लोखंडी कोयता, लोखंडी पाईप, लोखंडी कुऱ्हाड, दोरी, मिरची पुड, लाकडी दांडके चार मोटारसायकली ९ मोबाईल असा एकुण ३,३५०००/- रुपयाचा मुददेमाल मिळुन आला असून हे सर्वजण कुठेतरी दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याचे दिसून आले.

या प्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशला पोको/किशोर सुभाष जाधव यांचे फिर्यादीवरुन भारतीय न्याय संहिता कलम ३१०(४) ३१० (५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी नामे आरोपी नामे मयुर पोपट बोरुडे हा सराईत गुन्हेगार असुन त्याचेवर एमआयडीसी आणि तोफखाना पोलीस स्टेशनमध्ये गंभीर गुन्हे दाखल आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: सुषमा अंधारे अन् कुणाल कामराच्या अडचणीत वाढ; विधिमंडळात हक्कभंग प्रस्ताव मंजूर

Maharashtra Live News Update: वाल्मीक कराडची पोलखोल करणाऱ्या विजयसिंह बांगर यांनी घेतली अप्पर पोलीस अधीक्षकांची भेट

Auto Rickshaw Bag : बाजारात आलीये नवीन ऑटो रिक्षा बॅग, फॅशनचा नवा ट्रेंड

Somnath Suryawanshi: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणाला नवं वळण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे हायकोर्टाचे आदेश|VIDEO

Kondhwa Girl Abused : डिलिव्हरी बॉयकडून तरुणीवर अत्याचार; ५०० CCTV तपासले, पुण्यातील 'त्या' घटनेत मोठा ट्विस्ट, सेल्फी घेतलेला तरुणच...

SCROLL FOR NEXT