Mumbai Crime Saam TV
क्राईम

Mumbai Crime: धारदार शस्त्राने प्रेयसीची हत्या, नंतर स्वत:वर केला वार, लिव्ह-इन रिलेशनशिपचा भयंकर शेवट

Crime News: याप्रकरणी जखमी तरुणीच्या तक्रारीनंतर कुरार पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी प्रियकर बाबुराव मोरे याला ताब्यात घेतलं असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Ruchika Jadhav

संजय गडदे

Mumbai:

मुंबई मालाड पूर्व कुरार पोलीस ठाण्याच्या हद्दीत माथेफिरू प्रियकराने प्रेयसीवर धारदार शस्त्राने हल्ला केला आहे. या हल्ल्यात प्रेयसी गंभीर जखमी झाली आहे. प्रेयसीवर हल्ला केल्यानंतर प्रियकराने स्वतःवर देखील हल्ला करून जखमी करून घेतले आहे. याप्रकरणी जखमी तरुणीच्या तक्रारीनंतर कुरार पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी प्रियकर बाबुराव मोरे याला ताब्यात घेतलं असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, २९ वर्षीय मयत तरुणी पुणे जिल्ह्यात राहणारी असून दारुड्या नवऱ्याच्या त्रासाला कंटाळून ती पुणे परिसरात वेगळी राहत होती. तिच्याच गावातील बाबुराव मोरे याच्यासोबत तिचे प्रेमसंबंध जमले.

बाबुराव मोरे मैना गिरीला सोबत घेऊन मुंबईच्या कांदिवली शांतीनगर परिसरात भाड्याने राहत होता. बाबूराव रिक्षा चालवायचा. तीन वर्षांपासून दोघेही लिव्हइन रिलेशनशिपमध्ये राहत होते.

गुरुवारी बाबुराव मोरे यांनी एक धारदार चाकू विकत घेतला आणि मैना गंभीर जखमी केलं. या हल्ल्यात तरुणी जागेवरच मृत पावली. यानंतर बाबुरावने स्वतःवर देखील चाकूने वार केले.

यात तो देखील जखमी झाला असून त्याच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रुग्णालयातून डिस्चार्ज दिल्यानंतर त्याला ताब्यात घेऊन पुढील चौकशी केली जाईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Actor Car Accident: प्रसिद्ध अभिनेत्याच्या कारचा भीषण अपघात; चित्रपटाच्या प्रमोशनवरून परतत येताना घडली घटना

35000 ची मागणी, 30 हजारांत मांडवली; भंगारवाल्याकडून पोलिस चौकीतच लाच घेताना हवालदारांला रंगेहाथ पकडलं

Maharashtra News Live Update: आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकरांची मालेगाव सामान्य रुग्णालयाला अचानक भेट

Rahul Gandhi: राहुल गांधींच्या आंदोलनाला यश, पेलेट गनप्रकरणी अखेर गुन्हा, FIR मध्ये कुणाची नावं?

Vangyachi Chatni Recipe : गरमागरम भाकरी अन् वांग्याची झणझणीत चटणी, चव इतकी भन्नाट की विचारू नका!

SCROLL FOR NEXT