Malad Police Saam Tv
क्राईम

Malad Crime: एटीएम मशीनवर पट्ट्या टाकून पैसे काढणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; २ जणांना अटक

Malad Police: पोलिसांनी अटक केलेल्या टोळीतील दोन जणांवर मुंबई आणि पुण्यात ६ गुन्हे दाखल आहेत. अटकेत असलेली टोळी एटीएम मशिनवर पट्टी लावत आणि त्यातून पैसे लंपास करत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

(संजय गडदे, मुंबई)

Malad Police Arrested Two Thieves:

एटीएम मशिनवर प्लॅस्टिकची पट्टी लावून पैसे काढून नागरिकांना फसवणाऱ्या टोळीला मुंबईच्या मलाड पोलिसांनी अटक केली आहे. या टोळीचा एटीएमवर चोरी करण्याचा प्रकार पाहून पोलीस च्रकावलेत. अटकेत असलेले चोरांनी एटीएममधून पैसे चोरण्यासाठी मोठी शक्कल लढवली होती. चोराची शक्कल पाहून पोलीसही हैरान झालेत .(Latest News)

मलाड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या टोळीतील दोन जणांना अटक केलीय. अटक करण्यात आलेल्या २ जणांवर मुंबई आणि पुण्यात ६ गुन्हे दाखल आहेत. अटकेत असलेली टोळी एटीएम मशिनवर पट्टी लावून देत. आणि एटीएमच्या बाहेर थांबत. एटीएममधून पैसे काढण्यासाठी ग्राहक आल्यावर बाहेर थांबायची. एटीएममधून पैसे बाहेर पडत नाहीत. कदाचित एटीएममध्ये बिघाड आहे, असे ग्राहकांना वाटायचे. त्यामुळे ग्राहक तिथून निघून जात. यानंतर हे चोरटे एटीएममध्ये घुसून अडकलेली रक्कम प्लास्टिकची पट्टी काढून घेत आणि पैसे लंपास करत.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

चोराच्या या प्रकरातून ग्राहकांची मोठ्या प्रमाणावर फसवणूक झाल्यानंतर उघडकीस आले आहे. एटीएममधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये ही घटना कैदी झाल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. यानुसार पोलिसांनी या टोळीतील दोन जणांना अटक केली आहे. लोक अतिशय हुशारीने एटीएम मशीनमधून पैसे काढून इतर एटीएमला टार्गेट करायचे. पोलिसांनी अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून प्लास्टिक पट्टीसह रोख रक्कम जप्त केली आहे सध्या हे दोन्ही आरोपी मालाड पोलिसांच्या ताब्यात असून पोलीस अधिकचा तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: भिवंडीच्या मूलचंद कंपाऊंडमध्ये ऑइलच्या गोदामाला भीषण आग

High Blood Pressure : हाय BP च्या रुग्णांसाठी 'हा' ज्यूस ठरतो वरदान, आताच डाएटमध्ये करा समावेश

Weight Loss Diet: डाएटमध्ये भाकरीसोबत खा ही एक भाजी, फॅट होईल ७ दिवसातच कमी

Maharashtra Government: राज्य सरकारचा मोठा निर्णय! सरकारी कर्मचाऱ्यांसाठीचा २२ वर्षांपूर्वीचा नियम बदलला

Sambhajinagar: ट्रॅफिक पोलिसाला भरचौकात मारहाण, आधी शिवीगाळ नंतर कॉलर पकडून कानशिलात लगावली; VIDEO समोर

SCROLL FOR NEXT