Land records deputy superintendent caught accepting ₹500 bribe in Baglan saam tv
क्राईम

नाशिक एसीबीचा दणका; ५०० रुपये घेताना भूमिअभिलेख उपअधीक्षकाला पकडलं

ACB Arrested Deputy Superintendent : घर नावावर करण्यासाठी लाच मागितल्याच्या आरोपावरून बागलाण येथील भूमिअभिलेख उपअधीक्षकाला अटक करण्यात आलीय.

Bharat Jadhav

  • नाशिक जिल्ह्यातील बागलाणमध्ये लाचखोरीचे प्रकरण उघडकीस.

  • वडिलोपार्जित घर नावावर करण्यासाठी ५०० रुपयांची लाच मागितल्याचा आरोप.

  • भूमिअभिलेख कार्यालयातील उपअधीक्षकाला एसीबीने पकडले.

वारसाहक्काने मिळालेल्या घराची नोंद नावावर करण्यासाठी भूमिअभिलेख उपअधीक्षकाने लाच मागितल्याची घटना उघडकीस आली आहे. बागलाण येथील भूमिअभिलेख कार्यालयात नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचत लाचखोर अधिकाऱ्याला अटक केलीय. एसीबीच्या कारवाईमुळे महसुल विभागात खळबळ उडालीय.

याप्रकरणी सटाणा पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये भुमीअभिलेख उपअधिक्षक देवेंद्र मधुकर भावसार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. वारसाहक्काने मिळालेल्या घराची नोंद नावावर करून देण्यासाठी उपअधिक्षकांनी ५०० रुपयांची लाच मागितली होती.

या प्रकरणातील तक्रारदाराच्या मयत वडिलांचे सटाणा शहरात घर आहे. हे वडिलोपार्जित घर वारसाहक्काने स्वतःच्या नावावर नोंदवून घेण्यासाठी तक्रारदाराने भूमिअभिलेख कार्यालयाशी संपर्क साधला होता. संबंधित काम करून देण्यासाठी उपअधीक्षक देवेंद्र भावसार यांनी ५०० रुपयांच्या लाचेची मागणी केली. या संदर्भात सदर तक्रादार व्यापार्‍याने २८ ऑक्टोंबर रोजी नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. भुमीअभिलेख उपअधिक्षक लाचेची मागणी करीत असल्याचं त्यांनी आपल्या तक्रारीत म्हटलं होतं.

या तक्रारीनुसार पंचांसमक्ष लाचेच्या मागणीची पडताळणी करण्यात आली असता उपअधिक्षक भावसार यांनी वडिलोपार्जित घरावर वारसा हक्काने तक्रारदार यांचे नाव लावण्यासाठी तक्रारदाराकडे ५०० रूपये लाचेची मागणी पंचासमक्ष केल्याचे निष्पन्न झाले होते. या पार्श्वभूमीवर सोमवारी उपअधिक्षक भुमिलेख कार्यालयात लाचलुचपत विभागाच्या पथकाने सापळा लावून भावसार यांनी पंचासमक्ष तक्रादरार यांच्याकडून लाचेची रक्कम स्विकारताच त्यांना ताब्यात घेण्यात आले.

नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक विकास लोंढे, हवा. प्रभाकर गवळी, किरण धुळे यांच्या पथकातर्फे ही कारवाई करण्यात आली. या संदर्भात सटाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

५, ६ की ७? दिवाळीत संध्याकाळी किती वाजता दिवे लावावे? जाणून घ्या योग्य वेळ

मुंबईत अनधिकृत बांधकामांचा महापूर! १० वर्षांत २.१४ लाख तक्रारी, महापालिकेची कारवाई किती?

Maharashtra News Live Update: नाशिकमध्ये एफडीएची मोठी कारवाई, श्री बालाजी लाडू सेंटरवर अन्न व औषध प्रशासनाचा छापा

Dhanteras Horoscope 2026: धनत्रयोदशीला कोणत्या राशींवर होणार लक्ष्मीची कृपा? जाणून घ्या मेष ते मीन राशींचं भविष्य

सरकारकडून दिवाळीचं मोठं गिफ्ट! सिंधुदुर्ग-नवी मुंबई विमानसेवेचे बुकिंग सुरू; पहिलं उड्डाण कधी? तिकिटाचे दर अन् वेळापत्रक पाहा

SCROLL FOR NEXT