MP Crime News X
क्राईम

MP: आणखी एक 'निर्भया'! प्रायव्हेट पार्टमध्ये लोखंडी रॉड अन्...; गर्भाशय शरीराबाहेर आढळलं, नराधमांचं महिलेसोबत अमानवी कृत्य

MP Crime News : मध्यप्रदेशमधून एका ४५ वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. तिचे गर्भशय शरीराबाहेर आढळले. महिलेच्या प्रायव्हेट पार्टमध्ये लोखंडी रॉड घातल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

Yash Shirke

मध्यप्रदेशच्या खंडवा जिल्ह्यातून धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. खंडवा जिल्ह्यातील एका ग्रामीण भागात ४५ वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याची माहिती समोर आली आहे. शेजारच्या घरात अर्धनग्न अवस्थेत पाहिल्यानंतर पीडित महिलेच्या मुलीने पोलिसांना संपर्क केला. महिलेचे गर्भाशय तिच्या शरीराच्या बाहेर आल्याचे म्हटले जात आहे. यावरुनच पीडितेला किती क्रूर वागणूक देण्यात आली हे समजते. पोलीस घटनास्थळी पोहचण्याआधीच महिलेचा मृत्यू झाला होता.

रोशनी चौकी पोलीस ठाण्याच्या परिसरात ही घटना घडली आहे. महिलेच्या प्रायव्हेट पार्टमधून रक्त येत असल्याने आणि गर्भाशय शरीराच्या बाहेर पडलेले आढळल्याने पीडितेवर क्रूरपणे हल्ला झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. प्रायव्हेट पार्टमध्ये लाकडी किंवा लोखंडी रॉड घातला असावा असा पोलिसांना संशय आहे. ही घटना दिल्लीतील निर्भया प्रकरणासारखी आहे असे म्हटले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत महिला ही दोन मुलांची आई होती. गावातील हरी पालवी आणि सुनील धुर्वे यांना पोलिसांनी अटक केली आहे. पीडितेवर सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. घृणास्पद आणि क्रूर वागणूकीप्रमाणे त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यातील हरी पालवीच्या घरात ही पीडिता बेशुद्ध अवस्थेत आढळल्याचे ग्रामस्थांनी म्हटले आहे.

जेव्हा पीडित महिला शुद्धीवर आली, तेव्हा तिने घडलेला प्रकार सांगण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर लगेचच पोलिसांना बोलवण्यात आले. पण पोलीस घटनास्थळी दाखल होण्याआधीच महिलेचा मृत्य झाला. खलवा रुग्णालयात तिला नेण्यात आले. त्यानंतर तिचा मृतदेह खलवा रुग्णालयातून खंडवा जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला. फॉरेन्सिक विभागातील तज्ज्ञांच्या देखरेखीत तिचे शवविच्छेदन केले जाणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पश्चिम विदर्भातील 56 तालुक्यात दुष्काळ जाहीर

आमदार-खासदारांशी उद्धटपणे वागाल तर खबरदार...; अधिकाऱ्यांसाठी सरकारकडून नवे नियम जाहीर

Om Namah Shivaya Mantra Benefits: रोज १०८ वेळा ॐ नमः शिवाय मंत्राचा जप केल्याने शरीरावर आणि मनावर काय परिणाम होतो?

Chandrashekhar Bawankule : ओबीसींना आता १ रुपयात जमीन मिळणार! चंद्रशेखर बावनकुळेंचा निर्णय, सर्व विभागांना आदेश; पाहा सविस्तर

Pune Fort : पुण्याजवळ दडलाय इतिहासाचा खजिना! दोन डोंगरांवर वसलाय भव्य किल्ला

SCROLL FOR NEXT