Raja-Sonam Honyemoon Case Saam Tv News
क्राईम

Raja-Sonam Honyemoon Case : राजा-सोनमचा गाईडनं सांगितला थरारक घटनाक्रम, अचानक फिरली संशयाची सुई; पोलिसांनीच...

Raja-Sonam Honeymoon Latest Update : विपिन रघुवंशीने शिलाँग पोलिसांच्या तपास प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. त्यांचं म्हणणं आहे की, 'पोलीस खूप धीम्या गतीने तपास करत आहेत.

Prashant Patil

इंदूर : इंदूरहून शिलाँगला हनिमूनसाठी फिरायला गेलेलं नवविवाहित कपल राजा रघुवंशी आणि सोनम रघुवंशी केसमध्ये आता नवीन माहिती समोर आली आहे. पोलिसांनी एका नव्या गाईडकडे चौकशी सुरु केली आहे. त्याने दावा केला आहे की, हे कपल एकटं नाही, तर अन्य २ ते ३ लोकांसोबत फिरायला गेलं होतं. त्यामुळे या प्रकरणाला वेगळंच वळण लागण्याची शक्यता आहे. कारण आतापर्यंत कुटुंबियांना वेगळीच माहिती दिली जात होती. दरम्यान, मृत राजाचा भाऊ विपिन रघुवंशीनं यावर प्रश्न उपस्थित केला आहे. जर हा गाईडही त्यांच्यासोबत होता, मग पोलिसांनी त्याला समोर का आणलं नाही?

विपिन रघुवंशीने शिलाँग पोलिसांच्या तपास प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. त्यांचं म्हणणं आहे की, 'पोलीस खूप धीम्या गतीने तपास करत आहेत. अनेक महत्त्वाचे पुरावे हातातून जाऊ शकतात. हॉटेलच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये तीन संशयीत लोक दिसले आहेत. या लोकांची कसून चौकशी केली जात आहे. पोलिसांनी हॉटेलचं डीवीआर जप्त केलं आहे. पण पोलिसांच्या धीम्या तपासामुळे पुरावे नष्ट होऊ शकतात'.

राजाच्या कुटुंबियांनी शिलाँग प्रशासनाकडे पोस्ट मार्टेम रिपोर्टची मागणी केली आहे. परंतु, आतापर्यंत रिपोर्ट देण्यात आला नाही. यामुळे या प्रकरणातील महत्त्वाचे पुरावे नष्ट होऊ शकतात, अशी भीती कुटुंबियांना आहे. दरम्यान, पीडित कुटुंबियांनी या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली आहे. राजाची हत्या कोणी केली? याचा शोध लावण्यासाठी ही मागणी केली जात आहे. सोनम कुठे गायब झाली आहे? पोलिसांकडून अन्य गाईड आणि संशयितांकडे चौकशी केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Lucky Moles: कुठे तीळ असल्यावर लक्षमीची कृपा बरसेल? नाक, ओठ की...

Raj Kundra: १५० कोटींचे बिटकॉईन, ईडीने फास आवळला, राज कुंद्राच्या विरोधात चार्जशीट दाखल

Maharashtra Live News Update: पुणे बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावरील खंबाटकी घाट बंद

दहशतवाद कधी थांबेल? भारत तुम्हाला...; पत्रकाराच्या प्रश्नावर पाक पंतप्रधान भडकले, उत्तर न देताच निघून गेले

GK: जगातील पहिली कागदी नोट कोणत्या देशाने बनवली? जाणून घ्या इतिहास

SCROLL FOR NEXT