Uttar Pradesh Crime News Saam Tv
क्राईम

Shocking News : सोशल मीडियावरील मित्राला भेटायला गेली अन् विपरित घडलं, ७ वीच्या मुलीवर दोन दिवस सामूहिक बलात्कार

Uttar Pradesh Crime News : लखनऊमध्ये सोशल मीडियावर मैत्रीकरुन १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर दोन दिवस सामूहिक बलात्कार केला. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु आहे.

Alisha Khedekar

उत्तर प्रदेशातील १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

इंस्टाग्रामवर मैत्री करून पीडितेला भेटायला बोलावलं

हॉटेलवर नेऊन पीडितेवर दोन दिवस अत्याचार

पोलिसांनी तपास सुरु केला

उत्तर प्रदेशातील लखनऊ मधून धक्कदायक बातमी समोर आली आहे. एका ७ वीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीला इंस्टाग्रामवरची मैत्री महागात पडली आहे. या अल्पवयीन मुलीसोबत ओळख करून तिच्याशी मैत्री करून तिच्यावर दोन दिवस बलात्कार केल्याचा संतापजनक प्रकार उघड झाला आहे. आरोपींची नावे विमल यादव, पियुष मिश्रा आणि शुभम शुक्ला अशी आहेत. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून मुलींच्या सुरक्षिततेवर प्रश्नाचिन्ह उभे राहिले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलीने दीड महिन्यांपूर्वी इन्स्टाग्रामवर विमल यादव नावाच्या तरुणाशी मैत्री केली. ही मैत्री कालांतराने वाढत गेली. वाढलेल्या मैत्रीनंतर विमलने पीडितेला भेटण्यासाठी बोलावले. त्यानंतर तो तिला मडियांव पोलिस स्टेशन परिसरातील आयआयएम रोडवरील एका हॉटेलमध्ये घेऊन गेला. या हॉटेलमध्ये विमलचे मित्र सुद्धा आधीपासून येऊन थांबले होते.

पीडितेला हॉटेलच्या रूमवर घेऊन गेल्यानंतर विमलने आणि त्याच्या मित्रांनी मुलीवर जबरदस्ती करायला सुरुवात केली. मात्र या नराधमांच्या जाळ्यात फसलेल्या मुलीने त्यांना विरोध केला. मुलीने विरोध केल्याने तिला ओलीस ठेवण्यात आलं. त्यानंतर आळीपाळीने तिच्यावर दोन दिवस बलात्कार करण्यात आला. या दरम्यान त्यांनी व्हिडिओ देखील काढला. शिवाय पीडितेला हा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली.

२ नोव्हेंबर रोजी पीडितेने या नराधमांच्या तावडीतून पळ काढला आणि घर गाठले. घरी गेल्यावर पीडितेने घडलेला प्रकार कुटुंबियांना सांगितला. कुटुंबीयांनी तात्काळ पोलीस ठाण्यात धाव घेत घडलेल्या प्रकरणी तक्रार दाखल केली. पोलिसांनी तीन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरु केला आहे. या घटनेनं परिसरात भीतीचे वातावरण निर्मण झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News: पुण्यात फायनान्स कंपनीविरोधात शिंदेसेना आक्रमक, शेतकऱ्याच्या घराचं सील तोडलं

Train Accident: २ प्रवासी ट्रेनची एकमेकांना धडक, आतापर्यंत ४ प्रवाशांचा मृत्यू; ८८ जण गंभीर जखमी

Monday Horoscope: या राशींच्या आयुष्यात होणार मोठे बदल! कोणाला मिळणार पैशांचा लाभ? वाचा राशिभविष्य

Weight Loss Tips : वजन कमी करण्याचं सिक्रेट; 5 पदार्थ दररोजच्या आहारातून करा हद्दपार

Khan Saree Designs: महिलांसाठी खणाच्या साड्यांच्या लेटेस्ट डिझाईन्स, हे 5 पॅटर्न्स दिवाळीत दिसतील उठून

SCROLL FOR NEXT