lcb arrests uddhav thackeray faction taluka president in fake currency case near kolhapur  saam tv
क्राईम

Shiv Sena (UBT) : बनावट नाेटांचा छापखाना, ठाकरे गटाच्या तालुकाध्यक्षसह टाेळी जेरबंद

पोलिसांना याची कुण कुण लागताचं स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने तालुका प्रमुखांसह टोळीच्या मुसक्या आवळल्या.

Siddharth Latkar

- रणजीत माजगावकर

Kolhapur News :

कोल्हापूर जिल्ह्यातील उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटातील (uddhav thackeray faction) एका तालुकाध्यक्षाची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तालुकाध्यक्षाच्या पराक्रमामुळे कोल्हापुरातील ठाकरे गटाच्या अस्मितेला धक्का लागला आहे. एक लाखाला तीन लाख रुपये बनवून नोटा छापून देण्याचा प्रकार तालुकाध्यक्षांने सुरू केला होता. या प्रकरणी पाेलिसांनी तीन जणांना अटक केली आहे. (Maharashtra News)

पाेलिसांनी दिलेल्या माहितीनूसार या टोळीचा सूत्रधार अशोक बापू पाटील (वय ५१, रा. बेलवळे खुर्द, ता. कागल) हा आहे. त्याच्यासह मेहरूम अल्ताफ सरकवास (वय ४१) आणि सलील रफिक सय्यद (वय ३०, दोघे रा. घटप्रभा, जि. बेळगाव, कर्नाटक) या तिघांना अटक करण्यात आली आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

त्यांच्याकडून एक लाखाची रोकड आणि नोटा छपाईचे साहित्य असा दीड लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला. या तिघांची पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आल्याचे पाेलिसांनी नमूद केले.

संशयित अशोक पाटील हा कर्जबाजारी आणि आर्थिक गरजवंतांना हेरुन कर्नाटकातील साथीदारांच्या मदतीने तिप्पट रक्कम देण्याचे आमिष दाखवत आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांना मिळाली हाेती. पोलीस अधीक्षक पंडित यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला या गुन्ह्याचा छडा लावण्याचे आदेश दिले हाेते.

अशोक पाटील हा शिवसेना ठाकरे गटाचा कागल तालुका अध्यक्ष आहे अशी माहिती पोलीस तपासात पुढे आली आहे. मेहरूम सरकवास महिला असल्याचे सांगण्यात आले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

कोकणातून तटकरेंच्या मुलाची बिनविरोध निवड; महायुतीत खदखद, शिंदेसेनेची फरफट

इंडिया आघाडीला मोठा धक्का; ३० खासदार असलेल्या पक्षाने फिरवली महत्त्वाच्या बैठकीकडे पाठ

TMC Crisis: ममता बनर्जींना आणखी एक जबर धक्का; तब्बल २० खासदार पक्ष सोडण्याच्या तयारीत

Rain Alert : १९ राज्यांना वादळी वाऱ्यांसह पाऊस झोडपून काढणार, ८० किमी वेगाने वाहणार वारे; हवामान खात्याचा इशारा

Podi Idli Recipe: सकाळी नाश्त्यासाठी झटपट घरच्या घरी बनवा टेस्टी पोडी इडली, वाचा सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT