SHOCKING! ₹2.39 CRORE EMBEZZLEMENT CASE FILED IN LATUR POLICE SP OFFICE saam tv
क्राईम

स्पेशल 420 ! पोलीस अधीक्षक कार्यालयातच भ्रष्टाचार; पोलीस उपनिरीक्षकासह चौघांवर गुन्हा

Latur Police Office Fraud: लातूर पोलीस अधीक्षक कार्यालयातील वेतन विभागात कोट्यवधींच्या अपहारप्रकरणी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

Bharat Jadhav

  • लातूर पोलीस अधीक्षक कार्यालयात 2.39 कोटींचा अपहार उघड.

  • वेतन वितरण प्रक्रियेत गंभीर अनियमितता आढळली.

  • PSIसह चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल.

संदीप भोसले,साम प्रतिनिधी

लातूर पोलीस अधीक्षक कार्यालयातल्या वेतन विभागात कोट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार झाल्याच समोर आले आहे. वेतन वितरण प्रक्रियेत अनिमियता आढळल्याने चार जणाविरुद्ध लातूरच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तब्बल 2कोटी 39 लाख रुपयाचा अपहार झाल्याचं चौकशीत समोर आलं आहे.

मे 2015 पासून ते 2025 पर्यंत वेतन वितरणातील बेसिक इन्सेंटिव्ह या अनियमितता आणि खडाखोड आढळल्याने ही चौकशी करण्यात आली आहे. तर याप्रकरणी पोलिसांनी गंभीर दखल घेतली असून, लिपिक राहुल वागदरे, ब्रिजकिशोर ठाकूर, दत्तात्रेय शिरसागर आणि श्रेणी पोलीस उपनिरीक्षक अजय सूर्यवंशी यांच्याविरुद्ध शिवाजीनगर पोलिसात अपहार प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यापैकी तीन आरोपी सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे तरी एक आरोपी फरार आहे. दरम्यान आरोपींनी संगणमत करून स्वतःच्या बँक खात्यावर ही रक्कम स्वीकारली आणि शासकीय रकमेचा अपहार केल्याचा गंभीर आरोप त्यांच्यावर झाला आहे. लातूर पोलीस अधीक्षक कार्यालयातील वेतन वितरण प्रक्रियेमध्ये आर्थिक अनियमितता झाल्याची बाब प्राथमिक चौकशीत निष्पन्न झाल्याने पोलीस स्टेशन शिवाजीनगर, लातूर येथे गजानन भातलवंडे, उपविभागीय पोलीस अधिकारी, उदगीर तथा चौकशी अधिकारी यांचे फिर्यादीवरून लिपिक राहुल गोविंदराव वागदरे, ब्रिजकिशोर ठाकूर, दत्तात्रय मारुती क्षिरसागर व श्रेणी पोलीस उपनिरीक्षक अजय दिगंबर सूर्यवंशी यांचे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्राथमिक चौकशीत आरोपींनी मे २०१५ ते मार्च २०२५ या कालावधीत संगनमताने अप्रमाणिकपणे शासनाच्या रकमेचा अपहार केला. वेतन अभिलेखांमध्ये खाडाखोड करून, बनावट दस्तऐवज तयार करून व त्याचा गैरवापर करून Incentive, Basic Arrears, Special Pay व इतर वेतन शीर्षकांखाली अनधिकृतरीत्या जास्तीची रक्कम अदा करून व जास्तीचे अदा केलेल्या रकमेतून स्वतः करिता स्वतःचे बँक खात्यावर रक्कम वळवली.

यात २ कोटी ३८ लाख ९२ हजार ००७ इतक्या शासकीय रकमेचा अपहार करण्यात आल्याचा आरोप आहे.या गुन्ह्यातील तीन आरोपींना तात्काळ अटक करत न्यायालयात हजर केले. सदर आरोपींची न्यायालयाने दिनांक १६ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Summer Wedding Fashion: उन्हाळ्यातील लग्नसराईसाठी काय घालायचा? जड लेहेंगा सोडा, ट्राय करा हे कम्फर्टेबल ड्रेस

Maharashtra News Live Update: मुंबई गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी

आणखी एका भोंदू अशोकचे कारनामे, महिलेला लिंबू, जडीबुटी खायला द्यायचा; एकटीला बघून घरात घुसला, मुलाच्या समोरच भयंकर कृत्य

मातृदिनी भयंकर घडलं; मुलाच्या डोळ्यादेखत आईचा मृत्यू

Satara Tourism : साताऱ्यातील 'हे' गड-किल्ले आयुष्यात एकदा तरी पाहाच

SCROLL FOR NEXT