Latur Crime News father has been accused of his seven-year-old son to death Saam Tv
क्राईम

Latur Crime News: लातूरमध्ये माणुसकीला काळिमा! प्रॉपर्टीसाठी बापानेच ७ वर्षांच्या मुलाची केली हत्या

Latur Crime News: लातूरमध्ये प्रॉपर्टीतील वाटा द्यावा लागू नये म्हणून वडिलांनीच सात वर्षीय मुलाचा गळा आवळून खून केल्याचा आरोप आहे. मृतदेह नाल्यात फेकल्याप्रकरणी संशयित आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.

Shruti Vilas Kadam

Latur Crime News: प्रॉपर्टी मधील वाट्यावरून झालेल्या वादातून लातूरमध्ये जन्मदात्या बापानेच आपल्या अवघ्या सात वर्षीय चिमुकल्याचा गळा आवळून खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी संशयित आरोपी युसूफ मुबारक सय्यद (वय ५८) याला अटक केली असून, अरमान युसूफ सय्यद असे निर्घृणपणे बळी ठरलेल्या चिमुकल्याचं नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, युसूफ सय्यद याने आपल्या पहिल्या पत्नीच्या मुलांना प्रॉपर्टीत आधीच वाटा दिला होता. दुसऱ्या पत्नीच्या ७ वर्षांच्या मुलाला प्रॉपर्टीत कोणताच वाटा द्यावा लागू नये, या संकुचित व क्रूर भावनेतून त्याने पोटच्या मुलाचा काटा काढण्याचा कट रचला आहे. चिमुकल्या अरमानचा गळा आवळून हत्या केल्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने त्याचा मृतदेह घराच्या पाठीमागील शेतातून वाहणाऱ्या नाल्यात फेकून दिला.

दरम्यान, परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची कसून पडताळणी करत पोलिसांनी संशयाची सुई युसूफकडे वळवली. पोलिसींनी मुस्क्या आवळताच या थरारक गुन्ह्याचा पर्दाफाश झाला. त्यानंतर, पोलिसांनी शेतातील नाल्यातून चिमुकल्याचा मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी पाठवला.

तर या अमानुष घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व हळहळ व्यक्त होत आहे. लातूरच्या एमआयडीसी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणी पुढील कायदेशीर कारवाई करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dharashiv : धाराशिवमध्ये ३ पिढ्यांचा मृत्यू, दिवाळीची रात्र काळरात्र ठरली, ६ जणांचा होरपळून मृत्यू, नेमकं कारण आलं समोर

Stroke : स्ट्रोक येण्याच्या १ महिन्याआधी शरीरात दिसतात 'ही' ५ धोक्याची लक्षणं! दुर्लक्ष करणे पडेल महागात

Maharashtra News Live Update: त्र्यंबकेश्वर, सप्तशृंगी देवस्थानांना धमकी; मंदिरांची सुरक्षा वाढवली!

मुंबई-पुणे जुन्या महामार्गाचं सहापदरीकरण होणार! MMRDC चा प्लान; तब्बल 6 हजार कोटींचा खर्च?

Clove : तुम्ही दररोज १०-१२ लवंगा खाताय का? सावधान! आरोग्यासाठी योग्य की अयोग्य, वेळीच जाणून घ्या

SCROLL FOR NEXT