Crime News Saam TV
क्राईम

Crime News : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीशी भांडण जिवावर बेतलं; राहत्या घरात तरुणाची निर्घृण हत्या

Kolkata Crime : संहती आणि सार्थक सोशल मीडियावर एकमेकांना भेटले होते. त्यानंतर दोघेही कोलकाता येथील मधुबनी रोडवरील एका अपार्टमेंटमध्ये भाड्याच्या घरात राहत होते.

Ruchika Jadhav

Women killed his Boyfriend :

पश्चिम बंगालमध्ये महिलेने आपल्या लिव्हइन पार्टनरची चाकूने भोकसून हत्या केल्याची घटना समोर आली आहे. त्यानंतर महिलेने स्वत:च पोलीस स्टेशनमध्ये जात याबाबत माहिती दिली आहे. पोलिसांनी आरोपी महिलेला अटक केली आहे.

पोलिसांना घटनेची माहिती मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर पोलिसांना तिथे जे दृष्य पाहिले ते थरारक होतं. एक तरुण रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. पोलिसांनी तातडीने तरुणांना रुग्णालयात दाखल केलं मात्र पोलिसांनी त्याला मृत घोषित केलं.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सार्थक दास असं मृत तरुणाचं नाव आहे. तर संहती पॉल असं आरोपी महिलेचं नाव आहे. संहतीला एक मुलगा देखील आहे. संहती आणि सार्थक सोशल मीडियावर एकमेकांना भेटले होते. त्यानंतर दोघेही कोलकाता येथील मधुबनी रोडवरील एका अपार्टमेंटमध्ये भाड्याच्या घरात राहत होते.

संहती मुलासह तिच्या जोडीदारासोबत राहायला गेली होती. सार्थक एक फोटोग्राफर होता. दोघांमध्ये मागील काही दिवसांपासून वाद सुरु होता. गुरुवारी दोघांमध्ये जोरदार भांडण झालं. या भांडणाचं रुपांतर हाणामारीत झालं. त्यानंतर संहतीने टोकाचं पाऊल उचललं. तिने चाकूने सार्थकवर सपासप वार केले. यातच सार्थकचा मृत्यू झाला.

पोलिसांनी आरोपी महिलेला अटक केली असून अधिक तपास सुरु आहे. संहतीने देखील आपला गुन्हा कबूल केला आहे. सार्थकच्या कुटुंबीयांना आणि मित्रांना याबाबत माहिती मिळताच त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. आपला जिवाभावाचा मित्र अचानक आपल्यापासून अशापद्धतीने दूर गेल्याने सर्वांवर दु:खाचा डोंगर कोसळलाय.

संहतीला एक लहान मुलगा देखील आहे. आपल्या आईने केलेल्या कृत्याचा त्यालाही मोठा धक्का बसलाय. आधीच आपली आई आपल्या वडिलांसोबत राहत नाही आणि दुसऱ्या व्यक्तीसोबत राहते याने मुलगा त्रस्त आहे. त्यात आता आईने त्या व्यक्तीची हत्या केल्याचे त्याला समजल्याने त्याच्या नाजूक मनावर याचा परिणाम झालाय. मुलाने आईने तिच्या प्रियकारची हत्या केलेलं पाहिलं आहे की नाही हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai : विरारमध्ये भयंकर घडलं, अर्नाळा समुद्रात ४ मुलं वाहून गेली

Skin Care Tips: काही क्षणांत मिळवा नितळ त्वचा! घरच्या घरी असे तयार करा अॅलोवेरा कोलेजन जेल

Parenting Tips : मुलांना ट्यूशनला पाठवत असाल तर 'या' गोष्टींची घ्या खबरदारी, नाहीतर बिघडेल मुलांचे भविष्य

स्टायलिश दिसण्यासाठी बॉयफ्रेंडला गिफ्ट करा 5 ट्रेंडिंग शर्ट

Maharashtra News Live Update : नाशिक- कळवण तालुक्यातील भैताने दिगर गावात आदिवासी आणि पोलीस प्रशासन यांच्यात चकमक

SCROLL FOR NEXT