Woman Physical Assultted In Kolkata :  
क्राईम

संतापजनक! गोड बोलून फ्लॅटमध्ये नेलं अन्...; वाढदिवसाच्या रात्री महिलेसोबत घडलं भयंकर

Kolkata Crime News: कोलकाता येथील हरिदेवपूर येथे संतापजनक घटना घडलीय. दोन जणांनी एक महिलेला गोड बोलून एका फ्लॅटमध्ये नेलं आणि तेथे तिच्यावर अत्याचार केला. याप्रकरणी पोलीस तपास करत आहेत.

Bharat Jadhav

  • वाढदिवसाच्या रात्री महिलेवर अत्याचार

  • दोन्ही आरोपी सध्या फरार आहेत.

  • दोन्ही आरोपी पीडिताला खोटं आश्वसने देत होते.

कोलकतामध्ये एक धक्कादायक घटना घडलीय. दोन जणांनी महिलेवर अत्याचार केलाय. वाढदिवसाच्या दिवशी दोघांनी महिलेला गोड बोलून फ्लॅटमध्ये नेलं आणि तिच्यावर अत्याचार केला. कोलकाता येथील रिजंट्स पार्क परिसरात ही घटना घडलीय. याप्रकरणी संशयित फरार आहेत, तर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, महिलेचं वय २० वर्ष असल्याचं सांगितलं जात आहे. हरिदेवपूर येथे ही पीडित महिला राहते. शुक्रवारी, ५ सप्टेंबर रोजी तिच्या वाढदिवसाच्या रात्री तिच्या ओळखीच्या दोन लोकांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. चंदन मलिक आणि द्विप (दीप) बिस्वास अशी आरोपींची नावे आहेत. दोन्ही आरोपी सध्या फरार असून पोलिसांकडून त्यांचा शोध घेतला जात आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,पीडित महिला काही महिन्यांपूर्वी चंदन मलिकला भेटली होती. त्याने आपण दक्षिण कोलकात्यातील पूजा समितीचा प्रमुख असल्याचं पीडिताला सांगितलं होतं. काही दिवसांनी मलिकने महिलेची ओळख द्विपशी करून दिली. त्या दोघांनीही तिला समितीमध्ये सहभागी करून घेण्याचे आश्वासन दिलं होतं. त्याच भूलथापांना ही महिला बळी पडली.

घटनेच्या रात्री, आरोपींनी पीडितेला रिजेंट पार्क परिसरातील एका फ्लॅटमध्ये नेले. तेथे त्यांनी एकत्र जेवण केलं. जेव्हा पीडिता निघून जाण्याचा प्रयत्न करत होती, तेव्हा त्या दोघांनी तिला मारहाण केली. रुमचा दरवाजा बंद केला. त्यानंतर तिच्यावर बलात्कार केला. दुसऱ्या दिवशी सकाळी पीडिता तेथून पळून जाण्यात यशस्वी झाली आणि घरी परतली, असं पीडित महिलेनं सांगितलंय.

पीडितेने हरिदेवपूर पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, "एफआयआरमध्ये नाव नोंदवलेला आरोपी चंदन मलिक याने पीडितेला मालांचाजवळील दुसऱ्या आरोपी द्विप बिस्वासच्या घरी नेले. तेथे दोघांनीही मारहाण करत तिच्यावर बलात्कार केला. दरम्यान या प्रकरणाचा तपास पोलिसांकडून केला जात आहे."

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: उरण ONGC प्रकल्पाला भीषण आग

WhatsApp Down: व्हॉट्सअॅप अचानक डाऊन, सोशल मीडियावर तक्रारींचा पाऊस

IRCTC Jyotirlinga Yatra: बम बम भोले! भारतीय रेल्वेची ज्योतिर्लिंग यात्रा, कसं कराल तिकीटाचं बुकिंग, जाणून घ्या यात्रेची संपूर्ण माहिती

Shirpur : सुरुंग फुटून अंगावर पडला दगड; शिरपूर तालुक्यातील जवानाला लद्दाख येथे वीरमरण

Gardening Tips : या सोप्या टिप्स वापरून घरीच उगवा हिरवीगार पालक

SCROLL FOR NEXT