Kolhapur Live in Relationship Women Murder Saam Tv News
क्राईम

Kolhapur Crime : हॉलपासून किचनपर्यंत रक्ताचा सडा, चाकू बरगड्यांमध्येच अडकला, मृत्यूनंतरही समिक्षाला लाथा मारल्या; कोल्हापूर हत्याकांडाचा थरारक शेवट

Kolhapur Live in Relationship Women Murder : समीक्षा नरसिंगे ही सतीश यादव याच्यासोबतचे नाते तोडल्यानंतर मैत्रिणीसोबत सरनोबतवाडी येथील भाड्याच्या घरात राहत होती. या दोघी मिळून इव्हेंट मॅनेजमेंटचं काम करत होत्या.

Prashant Patil

कोल्हापूर : कोल्हापूरमध्ये लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या एका तरुणीची हत्या करण्यात आल्यानं एकच खळबळ उडाली होती. सतीश यादव आणि समीक्षा उर्फ सानिका भरत नरसिंगे (वय २३) हे दोघे गेल्या सहा महिन्यांपासून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. मात्र, अलीकडेच त्यांच्यात वाद झाल्यामुळे समीक्षा घर सोडून आपल्या मैत्रिणीसोबत राहायला गेली होती. गेल्या काही काळापासून सतीश यादव याने लग्नासाठी समीक्षाच्या मागे तगादा लावला होता. मात्र, सतीशच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीमुळे समीक्षाने लग्नाला नकार दिला होता. त्यामुळे संतापलेल्या सतीशने समीक्षा पुन्हा घरी आल्यानंतर तिची निर्घृणपणे हत्या केली. यानंतर सतीश यादव याने पन्हाळा तालुक्यातील आपल्या मूळगावी जाऊन आत्महत्या केली. गुरुवारी सकाळी सतीशचा मृतदेह एका झाडाला लटकलेल्या अवस्थेत सापडला.

समीक्षा नरसिंगे ही सतीश यादव याच्यासोबतचे नाते तोडल्यानंतर मैत्रिणीसोबत सरनोबतवाडी येथील भाड्याच्या घरात राहत होती. या दोघी मिळून इव्हेंट मॅनेजमेंटचं काम करत होत्या. मंगळवारी समीक्षा आपले सामान आणण्यासाठी मैत्रिणीसोबत सरनोबतवाडी येथील घरी सामान आणण्यासाठी गेली होती. तेव्हा तिने सतीशला फोन केला होता. समीक्षा त्याठिकाणी आल्याचं कळताच सतीश तेथे पोहोचला. यानंतर दोघांमध्ये लग्नावरुन पुन्हा एकदा कडाक्याचं भांडण झालं. मैत्रिणीने दोघांचा वाद थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, संतापलेल्या सतीशने त्याच्याकडे असलेला चाकू जोरात समीक्षाच्या छातीत खुपसला. सतीशने चाकू इतक्या जोरात खुपसला होता की, तो थेट बरगड्यांपर्यंत पोहोचला.

छातीत चाकू घुसल्यानंतर समीक्षा जागेवर कोसळली. त्यानंतर सतीश यादव तिला लाथा घालून घराबाहेर निघून गेला. यानंतर समीक्षाच्या मैत्रिणीने फोन करुन आपल्या मित्रांना बोलावून घेतले. या सगळ्यांनी जखमी अवस्थेतील समीक्षाला रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला होता.

सतीश आणि समीक्षा यांच्यात भांडण झाल्यानंतर मैत्रिणीने वाद सोडवायचा प्रयत्न केला. तिने सतीशला चाकू मारण्यापासून अडवण्याचाही प्रयत्न केला. मात्र, तिला यश आलं नाही. सतीशने चाकू जोरात समीक्षाच्या छातीत घुसवला. हा चाकू समीक्षाच्या बरगड्यांमध्ये अडकल्याने बाहेर निघत नव्हता. घरात हॉलपासून ते किचनपर्यंत समीक्षाच्या रक्ताचा सडा पडला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : प्रमाणपत्र वाटपाची सरकारची जबाबदारी; मराठा आरक्षणावरून जरांगे पुन्हा सरकारवर बरसले

महाराष्ट्राला आखाती युद्धाची धग, राज्यातील उद्योगधंदे 'गॅस' वर

साम टीव्हीचं 'ऑपरेशन सिलिंडर', सगळ्यात मोठ्या रॅकेटचा 'साम'वर भांडाफोड

मुंबईत पुन्हा हिट अँड रन; वाळूने भरलेल्या ट्रकने तिघांना चिरडलं, अपघातानंतर चालक फरार

मोठी बातमी! घरात AC, कार रेशन कार्ड रद्द होणार? 70 लाख रेशनधारकांना फटका बसणार

SCROLL FOR NEXT