Murgud young man was stripped and beaten Saam Tv News
क्राईम

Kolhapur Crime : चौघांनी घेरलं, कपडे काढून रॉड अन् काठ्यांनी बेदम मारलं; कोल्हापूरमध्ये तरुणाला विवस्त्र केलं

Kolhapur youth Stripped and Beaten : कोल्हापूरच्या मुरगुड परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे. चौघांनी केलेल्या जबर मारहाणीत सौरभ कांबळे (वय २४) हा तरुण गंभीर जखमी झाला आहे. जखमीवर सीपीआर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

Prashant Patil

कोल्हापूर : बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणात देशमुखांना ज्या पद्धतीने विवस्त्र करुन मारहाण करण्यात आलं होतं. त्या घटनेनं अख्खा महाराष्ट्र हादरला होता. या घटनेला जवजवळ सहा महिने उलटले आहेत, पण तरीही महाराष्ट्रात गुन्हेगारीचं प्रमाण काही करता कमी होताना दिसत नाहीय. यातच आता कोल्हापूरमध्ये अशीच एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथे देखील एका तरुणाला विवस्त्र करुन बेदम मारहाण करण्यात आल्याची संतापजनक घटना समोर आली आहे.

कोल्हापूरच्या मुरगुड परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे. चौघांनी केलेल्या जबर मारहाणीत सौरभ कांबळे (वय २४) हा तरुण गंभीर जखमी झाला आहे. जखमीवर सीपीआर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. सौरभला या नराधमांनी विवस्त्र करून रॉड, काठ्या आणि लाथा बुक्क्यांनी जबर मारहाण केलीय. मारहाण करतानाचा व्हिडिओ देखील मारेकर्‍यांनी काढला आहे. तसेच मारेकऱ्यांनी मारहाण करताना जातीवाचक शिवीगाळ देखील करण्यात आली. दरम्यान, या मारहाणीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे.

रिंगण करून बेल्ट अन् लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण

अहिल्यानगरमध्ये आठवीच्या विद्यार्थ्याला रिंगण करून मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शाळेच्या वसतीगृहामध्येच हा धक्कादायक प्रकार घडला आहे. याचा व्हिडीओ समोर आला असून तो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. शाळेतील नववीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या ग्रुपने आठवीच्या मुलाला मारहाण केली. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अहिल्यानगरच्या जामखेड येथील एका निवासी शाळेतील हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वसतीगृहातील नववीमध्ये शिकणाऱ्या मुलांनी आठवीमध्ये शिकणाऱ्या मुलाला बेदम मारहाण केली आहे. मारहाण करतानाचा व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल करण्यात आला आहे. जामखेडच्या अनुसूचित जाती जमाती, नवबौद्ध मुलांच्या निवासी विद्यालयातील हा प्रकार असल्याची प्राथमिक माहिती आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Horoscope Sunday: कामाच्या ठिकाणी होतील वाद, वाचा तुमच्या राशीत काय?

Bacchu Kadu :...तर पालकमंत्र्यांच्या गाड्या फोडू; बच्चू कडू असे का म्हणाले?

Manoj Jarange: डोळ्यावर गॉगल आणि घोड्यावर स्वारी; मनोज जरांगेंचा हटके लूक व्हायरल, पाहा व्हिडिओ

Maharashtra Live News Update : तेरा वर्षांच्या मुलीची हत्या करणाऱ्याचा एन्काऊंटर करा; तृप्ती देसाईंची संतप्त मागणी

Kaas Pathar : फुलांनी बहरलेले नंदनवन, 'कास पठार 'चं सौंदर्य पर्यटकांना खुणावते

SCROLL FOR NEXT