Kolhapur live in relationship Samiksha death case Saam Tv News
क्राईम

Kolhapur Crime : लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये कांड, कोल्हापुरातल्या समीक्षा हत्याकाडांत मोठी माहिती; आरोपीचा मित्राला फोन अन्...

Kolhapur Samiksha Murder Case : कोल्हापुरातून तो बाजार भोगाव येथे पोहोचला. तिथे एका मित्राकडून २०० रुपये घेतले. दुचाकीत पेट्रोल टाकून तो रात्री शाहूवाडी तालुक्यातील नांदारी येथील मित्र अरुण सुतार याच्या घरी गेला.

Prashant Patil

कोल्हापूर : कोल्हापूरमध्ये लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या एका तरुणीची हत्या करण्यात आल्यानं एकच खळबळ उडाली आहे. सतीश यादव आणि समीक्षा उर्फ सानिका भरत नरसिंगे (वय २३) हे दोघे गेल्या सहा महिन्यांपासून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. मात्र, अलीकडेच त्यांच्यात वाद झाल्यामुळे समीक्षा घर सोडून आपल्या मैत्रिणीसोबत राहायला गेली होती. गेल्या काही काळापासून सतीश यादव याने लग्नासाठी समीक्षाच्या मागे तगादा लावला होता. मात्र, सतीशच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीमुळे समीक्षाने लग्नाला नकार दिला. त्यामुळे संतापलेल्या सतीशने समीक्षा पुन्हा घरी आल्यानंतर तिची निर्घृणपणे हत्या केली. यानंतर सतीश यादव याने पन्हाळा तालुक्यातील आपल्या मूळगावी जाऊन आत्महत्या केली. काल गुरुवारी सकाळी सतीशचा मृतदेह एका झाडाला लटकलेल्या अवस्थेत सापडला.

याचदरम्यान पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लिव्ह इनमधील प्रेयसी समीक्षा आणि भारत नरसिंगे (वय २३, रा. कसबा बावडा, कोल्हापूर) हिचा खून करण्यापूर्वी हल्लेखोर सतीश यादव हा मंगळवारी मोबाइलवरून मित्रांच्या संपर्कात होता. सकाळपासूनच तो दारूच्या नशेत होता. दुपारी दोनच्या सुमारास त्याने प्रकाश सुळेकर या मित्राला फोन केला. समीक्षाचा खून करून स्वत:ही जीवन संपवणार असल्याचे त्याने मित्राला सांगितले. त्यानुसार अर्ध्या तासातच त्याने सरनोबतवाडी येथील भाड्याच्या घरात समीक्षाचा चाकूने भोसकून खून केला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेली समीक्षा आणि तिची मैत्रीण आयशू अंपले या दोघींना घरात कोंडून तो दुचाकीवरून निघून गेला.

कोल्हापुरातून तो बाजार भोगाव येथे पोहोचला. तिथे एका मित्राकडून २०० रुपये घेतले. दुचाकीत पेट्रोल टाकून तो रात्री शाहूवाडी तालुक्यातील नांदारी येथील मित्र अरुण सुतार याच्या घरी गेला. बुधवारी सकाळी घरातले कोणी उठण्यापूर्वीच तो दुचाकी घेऊन निघून गेला. काही वेळाने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे एक पथक नांदारीत सुतार याच्या घरी पोहोचले होते. त्यांनी सुतार याला सोबत घेऊन दिवसभर सतीशचा शोध घेतला. मात्र, तो सापडला नाही. अखेर काल गुरुवारी सकाळी तो गळफास घेतलेल्या स्थितीत आढळल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anganwadi Workers: अंगणवाडी सेविकांची दिवाळी गोड होणार! सरकारकडून भाऊबीज गिफ्ट; २००० रुपये मिळणार

Maharashtra Live News Update: २६ ऑक्टोबरपासून नाशिक-दिल्ली आणि हैदराबाद मार्गावर प्रत्येकी २ फ्लाइट

Jio New Recharge Plan: भन्नाट ऑफर! १०० रुपयांत मिळणार हजारो रुपयांचे फायदे; डेटा, मनोरंजन आणि अतिरिक्त ऑफर्स फ्री

Success Story: सरकारी नोकरी सोडली, UPSC परीक्षेत दोनदा फेल, जिद्द नाही सोडली, तिसऱ्या प्रयत्नात IAS; सर्जना यादव यांचा प्रवास

Asia Cup 2025 Final: भारत आणि पाकिस्तानमध्ये फायनल,आशिया कप स्पर्धेत कोण बाजी मारणार?

SCROLL FOR NEXT