kavathe mahankal police arrests two from karnataka in 5 crore theft case Saam Digital
क्राईम

Sangli Crime : 5 कोटींच्या लुटी प्रकरणी दोघांना अटक, कवठेमहांकाळ पोलिसांची कारवाई

विजय पाटील

कर्नाटक राज्यामध्ये दोन वर्षांपूर्वी खळबळ उडवून देणाऱ्या पाच कोटी लुटेतील मुख्य आरोपींना अटक करण्यात सांगली पोलिसांना यश आले आहे. कवठेमहांकाळ पोलिसांनी अजय मलमे आणि योगेश आठवले या दाेन संशयितांना अटक केली आहे.

या दोघांनीही कर्नाटक राज्यातल्या बैलहोंगल येथे 2022 मध्ये हवालाच्या माध्यमातून घेऊन जाण्यात येणारे पाच कोटींची रक्कम सिनेस्टाईल पद्धतीने लुट केली होती. याप्रकरणी कर्नाटकात दोघांवर गुन्हा दाखल झाला होता. त्यांचा पाेलिसांकडून शाेध सुरु हाेता.

दरम्यान कवठेमहांकाळ पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका बलात्काराच्या गुन्ह्यामध्ये योगेश आठवले याचा शोध घेत असताना त्याचा मित्र असणाऱ्या अजय मलमे याला ताब्यात घेतल्यावर दोघांनी मिळून बैलहोंगल मधले पाच कोटी रुपये लुटल्याचा तपासात समोर आले आहे. यानंतर या दोघांनाही अटक करण्यात आली.यापैकी अजय मलमे याला कर्नाटक पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Live Updates : पुण्यातील सर्व टेकड्यांवर आता बसवण्यात येणार "सर्च लाईट"

Walnut Benefit: दररोज अक्रोड खाण्याचे चमत्कारिक फायदे

Ladki Bahin Yojana : बँकांची चूक झाली की काय? महिलांच्या खात्यात जमा होतायत ४५०० रुपये, वाचा खरं कारण

Jammu And Kashmir : निवडणूक निकलाआधी दहशतवाद्यांचा डाव उधळला; भारतीय लष्कराने केली शस्त्रे आणि स्फोटके जप्त

Diabetes Control: मधुमेह नियंत्रित ठेवायचाय? 'या' रंगाचे तीळ ठरतील फायदेशीर...

SCROLL FOR NEXT