KODAGU HOMESTAY ASSAULT CASE: AMERICAN WOMAN ATTACKED, STAFF AND OWNER ARRESTED Saam Tv
क्राईम

Shocking : अमेरिकन महिलेला बेशुद्ध करून बलात्कार, होमस्टेमधील धक्कादायक प्रकार

Karnataka Crime News : कर्नाटकातील एका होमस्टेमध्ये अमेरिकन महिलेवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी आरोपी कर्मचाऱ्यासह मालकालाही अटक करण्यात आली आहे. या प्रकरणामुळे पर्यटकांच्या सुरक्षेवर गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.

Alisha Khedekar

  • कोडगूतील होमस्टेमध्ये अमेरिकन महिलेवर अत्याचाराचा आरोप

  • पेयात गुंगीचे औषध मिसळल्याची गंभीर बाब उघड

  • आरोपी कर्मचारी आणि होमस्टे मालक दोघेही अटकेत

  • पर्यटकांच्या सुरक्षेवर मोठा प्रश्नचिन्ह

कर्नाटकाच्या कोडगू जिल्ह्यातून एक अत्यंत गंभीर आणि लाजिरवाणी घटना समोर आली आहे. कुट्टा गावातील एका होमस्टेमध्ये अमेरिकन महिलेवर लैंगिक अत्याचार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. ही घटना सुमारे आठवडाभरापूर्वी घडल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी पोलिसांनी आरोपींवर गुन्हा दाखल करत बेड्या ठोकल्या आहेत. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सदर होमस्टेमध्ये काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याने महिलेच्या पेयामध्ये गुंगीआणणारे औषध मिसळले. महिला बेशुद्ध होताच कर्मचाऱ्याने संधी साधली आणि तिच्यावर अत्याचार केले. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी कर्मचाऱ्याला तात्काळ अटक केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, पीडितेने तक्रार करूनही हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून होमस्टेच्या मालकालाही अटक करण्यात आली आहे.

घटनेनंतर होमस्टेच्या मालकाने तीन दिवसांसाठी होमस्टेतील वाय-फाय सेवा बंद केल्या असल्याचं महिलेने म्हटलं, ज्यामुळे पीडितेला बाहेरील जगाशी संपर्क साधता आला नाही. मात्र, प्रसंगावधान राखत संबंधित महिला नंतर म्हैसूरला जाण्याचे कारण सांगून तेथून बाहेर पडली आणि तिने अमेरिकी दूतावासाशी संपर्क साधला. दूतावासाने तत्काळ स्थानिक पोलिसांना माहिती दिल्यानंतर प्रकरण उघडकीस आले.

पोलिस अधिकारी बिंदू मणी आर.एन. यांनी सांगितले की, पीडितेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात येत आहेत. दोन्ही आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान, राज्याचे गृहमंत्री जी. परमेश्वर यांनी या घटनेवर संताप व्यक्त करत दोषींवर कठोर कारवाई होईल, असे स्पष्ट केले. या घटनेनंतर पर्यटकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मुंबई इंडियन्सविरुद्ध सामन्याआधी CSK शोक सागरात; स्टार खेळाडूच्या जवळच्या व्यक्तीचं निधन

मित्राच्या बायकोवर बलात्कार, बड्या अधिकार्‍याच्या मुलीची अब्रु लुटली; २३ वर्षाच्या नराधमाचा 'तो' भयानक प्लॅन उघड

Bhagyashree Limaye: बुगडी माझी सांडली गं...; मराठमोळा साज अन् देखणं रुप, भाग्यश्रीचे नवे फोटो पाहिलेत का?

Maharashtra News Live Update: बारामती विधानसभा पोटनिवडणूक: दुपारी ३ वाजेपर्यंत ४०.३६ टक्के मतदान

गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंडचा बंद खोलीत सापडला मृतदेह; 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT