सध्या देशभरात कावड यात्रा सुरू आहे. अनेक ठिकाणांहून कावाडीयांकडून करण्यात येणाऱ्या हाणामारीच्या बातम्या येत आहेत. याचदरम्यान उत्तर प्रदेशामधील मिर्झापूर येथील एक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये कावड घेऊन जाणारे लोक एका सीआरपीएफ जवानावर हल्ला करताना दिसत आहेत. हल्ल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर, आरपीएफने तीन कावड्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय.
मिर्झापूर रेल्वे स्थानकावर कावड घेऊन जाणाऱ्या भाविकांनी एका सीआरपीएफ जवानाला बेदम मारहाण केली. या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. यामध्ये भाविक जवानाला लाथा आणि मुक्का मारताना दिसत आहेत. आरपीएफने तीन कावड्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे तर चार अल्पवयीन मुलांना चाइल्ड लाईनकडे पाठवण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तो जवान मणिपूरला जात होता. सावन महिन्यात अनेक कावड यात्रेकरून विविध गाड्यांमधून बैद्यनाथ धाम येथे जलाभिषेक करण्यासाठी जातात. शनिवारी सकाळी ९:३० च्या सुमारास कावड यात्रेकरूचा एक ग्रुप ब्रह्मपुत्र मेलने बैद्यनाथ धामला जात होता. ते तिकिटे काढण्यासाठी मिर्झापूर रेल्वे स्थानकावर आले होते.
त्यावेळी ग्रामीण पोलीस स्टेशन परिसरातील खुठा येथील रहिवासी सीआरपीएफ जवान गौतम कुमार देखील तिकीट खरेदी करण्यासाठी काउंटरवर आला. आधी तिकीट खरेदी करण्याच्या वादातून कावड यात्रेकरू आरपीएफ जवान गौतम कुमारशी वाद झाला.
हा वाद इतका वाढला की, कावड्यांनी सीआरपीएफ जवानाला लाथा-बुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. यामुळे तिकीट काउंटरवर धावपळ उडाली. या हाणामारीची माहिती आरपीएफचे सहाय्यक उपनिरीक्षक प्रदीप कुमार पाल आणि जीआरपीचे प्रभारी निरीक्षक यांना मिळाली. दोघांबरोबर सुरक्षा जवान होते. त्यानंतर जवानाला मारहाण करणारे सिटी कोतवाली परिसरातील फथान येथील रहिवासी सत्यम, कजराहवा पोखरा येथील रहिवासी अभिषेक साहू आणि अभय तिवारी यांना अटक करण्यात आली आणि त्यांना आरपीएफ पोलीस ठाण्यात नेण्यात आले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.