धक्कादायक! घरामागे लाकडे ठेवल्याने शेजारी संतापला, धारधार शस्त्राने केला प्राणघातक Google
क्राईम

Kalyan Crime: धक्कादायक! घरामागे लाकडे ठेवल्याने शेजारी संतापला, धारधार शस्त्राने केला प्राणघातक हल्ला

Kalyan: कल्याणजवळील सापाड गावात घराच्या मागील बाजूस लाकडे ठेवण्यावरून शेजाऱ्यांमध्ये वाद झाला, ज्यात एका शेजाऱ्याने दुसऱ्यावर धारधार शस्त्राने प्राणघातक हल्ला केला.

Abhishek Deshmukh

कल्याणजवळील सापाड गावात शेजाऱ्यांमध्ये वाद झाल्याची घटना घडली आहे. हा वाद घराच्या मागील बाजूस लाकडे ठेवण्यावरून निर्माण झाला. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि एका शेजाऱ्याने दुसऱ्यावर धारधार शस्त्राने प्राणघातक हल्ला केला.

नेमकं घडलं काय?

सोमनाथ गायकवाड हे आपल्या कुटुंबासह सापाड गावात राहतात. त्यांचे शेजारी कल्पेश भोईर देखील आपल्या कुटुंबासोबत तेथेच वास्तव्यास आहेत. सोमनाथ यांनी आपल्या घराच्या मागे काही लाकडे ठेवली होती. यावरून दोघांमध्ये वाद निर्माण झाला.

कल्पेश भोईर यांनी सोमनाथ यांच्या कुटुंबीयांना लाकडे का ठेवली याबाबत विचारणा केली. त्यानंतर, जेव्हा सोमनाथ घरी परत आले, तेव्हा कल्पेशने त्यांना बोलावून घेतले. दोघांमध्ये यावरून जोरदार वाद झाला आणि संतप्त झालेल्या कल्पेशने धारदार शस्त्राने सोमनाथवर हल्ला केला.

सोमनाथ गायकवाड गंभीर जखमी

या हल्ल्यात सोमनाथ गंभीर जखमी झाले असून, त्यांना तातडीने उपचारासाठी कल्याण येथील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पोलीस तपास सुरू

या घटनेची माहिती मिळताच खडकपाडा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तातडीने कारवाई करत कल्पेश भोईर विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास खडकपाडा पोलीस करीत आहेत.

Edited By - Purva Palande

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Girish Mahajan : मंत्री गिरीश महाजनांच्या नावाने नाशिकमध्ये TDR घोटाळ्याचा आरोप, चौकशीचे आदेश

देवेंद्र फडणवीस शेतकऱ्यांच्या सुख दुःखात पाठीशी उभं असणारं नेतृत्व: रविंद्र चव्हाण

Pandharpur VIP Darshan : पंढरपुरात VIP दर्शनावरुन वाद, मंत्री-आमदारात भेदभाव केल्याची चर्चा

Maharashtra News Live Update: उंबरणेवाडीत पुन्हा झोळीतून बाळंतीण महिलेचा प्रवास

Sunetra Pawar : मुख्यमंत्र्यांसोबत पटेल-तटकरेंची गुप्त भेट, नेमकं कारण काय? नाराज सुनेत्रा पवारांनी विचारला जाब?

SCROLL FOR NEXT