Kalyan Crime News Saam Digital
क्राईम

Kalyan Crime News: ढाब्यावर गाणी लावण्यावरून डोंबिवलीत तरुणींना मारहाण, तरुण फरार

Kalyan Crime News: ढाब्यावर गाणी लावण्यावरून तरुण तरुणींमध्ये झालेल्या वादानंतर विनयभंग आणि मारहाणीसारखा धक्कादायक प्रकार डोंबिवलीमध्ये घडला आहे

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अभिजित देशमुख

Kalyan Crime News

ढाब्यावर गाणी लावण्यावरून तरुण तरुणींमध्ये झालेल्या वादानंतर विनयभंग आणि मारहाणीसारखा धक्कादायक प्रकार डोंबिवलीमध्ये घडला आहे. याप्रकरणी डोंबिवली पोलीस ठाण्यात चार तरुणांविरोधात पीडितेने तक्रार दाखल केली आहे. दरम्यान पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून त्या तरुणांचा शोध सुरू केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी काल आपल्या दोन मैत्रिणींसोबत डोंबिवली पूर्वेकडील 90 फिट रोडवरील एका ढाब्यावर जेवणासाठी गेली होती . जेवत असताना सुमित व त्याच्या मित्रांनी ब्लूटूथ वरून मराठी गाणी लावली होती. त्यावेळी पीडिता व तिच्या मैत्रिणीने सुमितला हिंदी गाणी लावण्याची विनंती केली. यावरून पीडिता तिच्या मैत्रिणी आणि सुमित व त्याच्या मित्रांमध्ये वाद सुरू झाला.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

हा वाद सुरू असताना सुमितच्या मित्रांनी या पीडित तरुणींचा व्हिडिओ काढला. पीडीतेने हा व्हिडिओ डिलीट करण्याची विनंती केली. मात्र संतापलेल्या सुमितने व्हिडिओ डिलीट तर केलाच नाही उलट त्या पीडितेचा विनयभंगा केला. इतकेच नाही तर तिथे असलेले सुमित चे मित्र राहुल ,दानिश आणि सुमित यांनी पीडितेच्या मैत्रिणींना मारहाण करायला सुरुवात केली. दरम्यान या प्रकारानंतर पीडित तरुणीने थेट डोंबिवली पोलीस स्थानक गाठले आणि तक्राग दाखल केली. तक्रारीनुसार पोलिसांनी सुमित गायकवाड व त्याच्या तीन मित्रांविरोधात गुन्हा दाखल करत त्यांचा शोध सुरू केलाय .

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heart failure symptoms: हार्ट फेल्युअर होण्याच्या काही तासांपूर्वी दिसतात हे 5 बदल, तिसरं लक्षण दिसताच डॉक्टरकडे धावा

Gold Rate Today: महिन्याच्या शेवटी सोनं झालं स्वस्त, 10 तोळा सोन्यात 14,700 रुपयांची घसरण; वाचा 18k- 22k आणि 24k चे दर

भीषण अपघात! मिनीबस अन् ट्रकची जोरदार धडक; ५ जणांचा जागीच मृत्यू, ७ जण मृत्यूशी देतायत झुंज

LPG Price September : 1 सप्टेंबरपासून LPG-PNG ग्राहकांसाठी मोठे बदल! सिलेंडरच्या दरांपासून e-KYC पर्यंत जाणून घ्या अपडेट्स

Clove Water Benefits: सलग १० दिवस लवंगाचं पाणी प्यायल्याने शरीरात काय बदल होतात? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT