Kalyan Crime Saam Tv
क्राईम

Kalyan Crime News: चायनीजची गाडी सुरू करण्याच्या आनंदात सेलिब्रेशन पार्टी, त्याआधीच मित्राची हत्या, नक्की काय घडलं?

Friend Killed In Party: कल्याणमधून एक धक्कादायक घटना समोर आलीय. दोन मित्र चायनिज गाडी सुरू करणार होते. त्याअगोदरच एका मित्रानेच दुसऱ्या मित्राचा खून केलाय. खून का केला, नक्की काय घडलं, हे सविस्तर जाणून घेऊ या.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Kalyan Crime News Friend Killed

राज्यात खून, चोरी, दरोडा या रोजच्या घटना झाल्या आहेत. कल्याणमधून (Kalyan) एक हत्येची घटना समोर आली आहे. दारू पार्टीत एका क्षुल्लक वादातून तरूणाची हत्या झाल्याचं समोर आलंय. आरोपी मनपाडा पोलिसांच्या ताब्यात आहे. (Latest Marathi News)

नक्की काय घडलं

दोन मित्र पार्टनरशिपमध्ये चायनीज गाडी सुरू करणार होते. या आनंदात दोघांनी पार्टी दिली. मात्र, या दारू पार्टीमध्ये शुल्लक वादातून दोघांमध्ये वाद झाला. याच वादातून एका मित्राने दुसऱ्या मित्राचीच हत्या केलीय. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

आनंदात सेलिब्रेशन पार्टी

ही धक्कादायक घटना कल्याण पूर्व आडीवली परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास घडली. वाजिद सय्यद असं मयत तरुणाचं नाव आहे. याप्रकरणी मानपाडा पोलिसांनी परेश शीलकर या तरुणाला ताब्यात घेतलंय. याप्रकरणी मानपाडा पोलिसांनी पुढील तपास सुरू (Kalyan Crime News) केलाय.

मलंग रोड परिसरात राहणारा परेश शिलकर आणि वाजिद सय्यद हे पार्टनरशिपमध्ये चायनीजची गाडी सुरु करणार होते. दोघांची तयारी झाली होती. काही दिवसातच यांचं चायनीज सेंटर सुरू होणार होते. यामुळे वाजिद सय्यद आणि परेश शिलकर व त्याच्या मित्रांनी अडवली परिसरातील एका निर्मानाधीन इमारतीमध्ये पार्टी दिली होती.

पार्टीत मित्रावर केला हल्ला

या ठिकाणी त्यांचे मित्र देखील होते. पार्टी दरम्यान वाजिद व परेशमध्ये वाद झाला. या वादातून परेशने वाजिद सय्यदवर लोखंडी पत्र्याने हल्ला केला. त्यात वाजिदचा मृत्यू (friend killed) झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. धक्कादायक म्हणजे हल्ला केल्यानंतर परेशनेच कंट्रोल रूमला फोन करून या घटनेची माहिती दिली.

मानपाडा पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत परेशला ताब्यात (Kalyan Crime News) घेतले. या प्रकरणी मानपाडा पोलीस पुढील तपास करत आहे. यापूर्वी देखील नागपूरमध्ये पैशाच्या वादातून एका मित्राने आपल्या दुसऱ्या मित्राची सुपारी देऊन हत्या केल्याची घटना समोर आली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Beautiful Railway Station: देशातील ९ ऐतिहासिक आणि आकर्षक रेल्वे स्थानके, पर्यटकांसाठी आहेत खूप खास

Maharashtra Rain Live News : लोकसभेत घटनादुरूस्ती विधेयक मांडले, विरोधकांचा गोंधळ

Pune News : पुणेकरांना मोठा दिलासा; सिंहगड रोडवरील नवा उड्डाणपूल लवकरच होणार सुरू

Shocking: शाळेत हत्येचा थरार! नववीच्या विद्यार्थ्याने दहावीच्या विद्यार्थ्याला चाकूने भोसकलं, जमावाकडून शाळेची तोडफोड

Chandrabhaga River Flood : पंढरपुरात ४०० नागरिकांचे करणार स्थलांतर; चंद्रभागेच्या पुराने कुटुंब बाधित

SCROLL FOR NEXT