Kalyan Crime News Saam TV
क्राईम

Kalyan Crime News: भटक्या श्वानाची दगडाने ठेचून हत्या; कल्याणमधील हृदय पिळवटून टाकणारी घटना

Man Attack On Stray Dog: मारहाणीमुळे श्वान वेदनेने विव्हळत होता. ही संपूर्ण घटना मोबाईल कॅमेरात कैद झाली असून हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Ruchika Jadhav

अभिजित देशमुख

Kalyan Crime:

भटक्या कुत्र्याच्या डोक्यात दगड घालून त्याला गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कल्याण पूर्वेकडील पिसवली परिसरात ही घडना घडलीये. व्यक्ती श्वानाला मारत असाताना काहींनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याने कुणाचंही ऐकलं नाही आणि श्वानावर हल्ला केला. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ देखील काहींनी आपल्या मोबाईलमध्ये कैद केलाय. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

या हल्ल्यात जखमी झालेल्या श्वानाचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय. याप्रकरणी निर्दयी ओम प्रकाश सिंह विरोधात मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करत पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.

कल्याण पूर्व येथील मलंग रोड पिसवली लगतच्या 50-50 धाब्या नजीक श्वान बसला होता. तेव्हा ओम प्रकाशने त्याच्या डोक्यात दगड घालत त्याला गंभीर जखमी केलं. मारहाणीमुळे श्वान वेदनेने विव्हळत होता. ही संपूर्ण घटना मोबाईल कॅमेरात कैद झाली असून हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

यात ओम प्रकाशला आजूबाजूचे नागरिक हे कृत्य करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. मात्र कोणाचेही न ऐकता ओमप्रकाश याने दोन मोठे दगड या कुत्र्याच्या डोक्यात घालून त्याला गंभीर जखमी केलेले दिसत आहे. प्राणी मित्रांनी या जखमी श्वानाला उपचारासाठी रुग्णालयात नेले. मात्र गंभीर जखमी झालेल्या या श्वानाचा मृत्यू झालाय.

याप्रकरणी अलाईज फॉर ॲनिमल फाउंडेशनच्या सोनाली वाघमारे यांनी तात्काळ मानपाडा पोलीस ठाण्यात धाव घेतली. तसेच प्राणी मित्रांच्या मदतीने या श्वानाचा मृतदेह पोलीस ठाण्यात आणला. या निर्दयी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जातेय. मानपाडा पोलिसांनी या गंभीर घटनेची दाखल घेत ओमप्रकाश विरोधात गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

DA Hike : कर्मचाऱ्यांची दिवाळीत चांदी! पगार वाढणार, 'या' राज्यात DA मध्ये थेट 8% वाढ

Gold Rate Today: गणेशोत्सवात सोन्याचे दर पुन्हा घरसले, आज सोनं खरेदीची सुवर्णसंधी; 18k- 22k आणि 24k चे दर किती?

Sonam Maskar: कोल्हापूरच्या लेकीचा देशासाठी ‘अचूक निशाणा’; सोनमने आशियाई नेमबाजीत पटकावलं रौप्यपदक, वडिलांच्या संघर्षाचंही झालं चीज

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी, या आठवड्यात खात्यात जमा होणार ₹1500

Maharashtra News Live Update: जालनाच्या अंबडमध्ये दुकानाला भीषण आग, 4 ते 5 दुकानात जळून खाक

SCROLL FOR NEXT