Kalyan Crime News Saam Digital
क्राईम

Kalyan Crime News: दारूपार्टी रंगात असतानाच झाला वाद, मित्राने मित्राचीच गोळ्या झाडून केली हत्या

Kalyan Crime News: कल्याणनजीक असलेल्या म्हारळमध्ये नशेखोर मित्रांची दारूपार्टी सुरू होती. पार्टी रंगात आली असतानाच आपापसात शिविगाळ झाल्याने मित्रांमध्ये वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला संतापाच्याभरात एकाने देशी कट्ट्याने गोळी झाडून राजन उर्फ जानू येरकरची हत्या केली.

Sandeep Gawade

Kalyan Crime News

कल्याणनजीक असलेल्या म्हारळमध्ये नशेखोर मित्रांची दारूपार्टी सुरू होती. पार्टी रंगात आली असतानाच एकमेकांना सरज शिविगाळ सुरू केली. यावरून वाद सुरू झाला आणि काही क्षणात हा वाद इतका विकोपाला गेला की संतापाच्याभरात एकाने देशी कट्ट्याने मित्राचीच गोळ्या झाडून हत्या केली आहे. राजन उर्फ जानू येरकर असे हत्या झालेल्या मित्राचं ना्व आहे. या प्रकरणात टिटवाळा पोलिसांनी रोहित भालेकर आणि समीर चव्हाण या दोघांना अटक केली आहे. अन्य दोन जण परवेज शेख आणि सुनिल वाघमारे यांचा पोलिस शोध घेत आहेत. चार पैकी तिघे सराईत गुन्हेगार आहेत. दरम्यान या घटनेमुळे म्हारळ परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कल्याणनजीक असलेल्या ग्रामीण भागातील म्हारळ येथील सूर्यानगर परिसरात रोहित भालेकर ,परवेज शेख, सुनिल वाघमारे, समिर चव्हाण आणि राजन येरकर हे पाच नशेखोर मित्र दारू पित बसले होते. दारू पार्टी रंगातच आली होती. इकक्यात आपाससात सहज शिविगाळ झाली. त्यावरून राजन आणि एका मित्रामध्ये वाद झाला. या दरम्यान संतापलेल्या रोहित भालेकर याने परवेजच्या कमरेला असलेल्या देशीकट्टा हिसकावून घेतला आणि राजन येरकरवर फायरिंग करायला सुरूवात केली. या गोळीबारात राजन येरकर जाग्यावरच कोसळला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

या प्रकरणात टिटवाळा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक जितेंद्र ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली संदीप शिंगटे यांच्या पथकाने काही वेळातच पोलिसांनी रोहित भालेकर आणि समिर चव्हाण याला अटक केली. मात्र या प्रकरणातील सुनिल आणि परवेज हे दोघे अद्याप फरार आहेत. या दोघांचा पोलीस शोध घेतायेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: दिल्लीतील अनेक शाळांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी

Pune : पुण्यात वाहतुकीत मोठा बदल! 'या' महत्त्वाच्या मार्गावरील वाहतूक २ तास राहणार बंद; पर्यायी मार्ग कोणते? जाणून घ्या

Dal Benefits : हृदय अन् मेंदूसाठी वरदान! रोज मूठभर खा 'ही' डाळ, ७ फायदे वाचून व्हाल थक्क

RuPay आणि UPI यूजर्ससाठी गुड न्यूज! ₹2,000 पर्यंतचे पेमेंट फ्री, नंतर चार्ज लागणार; सरकारचा मोठा निर्णय

गणपतीच्या नैवेद्यासाठी केळीचे पानच का वापरतात? वाचा धार्मिक महत्व

SCROLL FOR NEXT