Kalyan Crime News Saam Digital
क्राईम

Kalyan Crime News: मद्यधुंद तरुणाचा वाहतूक पोलिसांसोबत राडा, महिलांसोबत चौकात घातला धिंगाणा

Kalyan Crime News: कल्याण छत्रपती शिवाजी महाराज चौकात एका मद्यधुंद तरुणाने पोलिसाशी हुज्जत घालत शिविगाळ केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या प्रकरणी महात्मा फुले पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करणार असल्याचे शिविगाळ करण्यात आलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांने सांगितलं.

Sandeep Gawade

Kalyan Crime News

कल्याण छत्रपती शिवाजी महाराज चौकात एका मद्यधुंद तरुणाने पोलिसाशी हुज्जत घालत शिविगाळ केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या प्रकरणी महात्मा फुले पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करणार असल्याचे शिविगाळ करण्यात आलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांने सांगितलं असून याचा व्हिडिओ मोबाईलमध्ये कैद झाला होता. तो सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला आहे.

संबंधीत पोलिसांने दिलेल्या माहितीनुसार, कल्याण छत्रपती शिवाजी महाराज चौकात दुचाकीवर ट्रिपल सीट जाणाऱ्या तरुणाला वाहतूक पोलिसांनी अडवलं . कागदपत्रांची तपासणी करत या तरुणाने मद्यप्राशन केल्याचं लक्षात आल्याने पोलिसांनी त्याची ब्रेथ एनलायझरने तपासणी सुरू केली . यावेळी या तरुणाने व त्याच्यासोबत आलेल्या दोन्ही महिलांनी वाहतूक पोलिसांसोबतच अरेरावीची भाषा करत शिवीगाळ केली ,पोलिसांशी हुज्जत घालायला लागले.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. वाहतूक पोलिसांनी या तरुणाविरोधात मद्यप्राशन करत गाडी चालवल्या प्रकरणी गुन्हा दाखल केलाय.तसेच या तरुणाविरोधात सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी तसेच उद्धट वर्तन केल्याप्रकरणी महात्मा फुले पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करणार असल्याचे सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मनोज जरांगे पाटील 11 वाजता अंतरवाली सराटीतून मुंबईचे दिशेने रवाना होणार

Aadhaar Card Update : आधार कार्डधारकांसाठी मोठी बातमी! UIDAIने बदलली Face Authenticationची पद्धत, असा होणार फायदा

Gold Rate : गणेशोत्सवात सोनं खरेदीदारांना दिलासा! १० तोळे ९२०० रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या 22k, 24k, 18k चे आजचे ताजे दर

Chocolate Modak vs Mawa Modak: चॉकलेट मोदक की मावा मोदक? यंदाच्या गणेशोत्सवात लहान मुलांसाठी बनवा हे दोन्ही मोदक

LDL cholesterol: निरोगी व्यक्तीची कोलेस्ट्रॉल लेव्हल किती? ही रेंज माहित आहे का?

SCROLL FOR NEXT