Kalyan Crime News Saam tv
क्राईम

Kalyan Crime: लोकलमधून मोबाईल चोरीतील आरोपी कारागृहातचं सापडला, ८ फोन जप्त; काय आहे प्रकरण?

Kalyan Latest News: काही दिवसांपासून मध्य रेल्वेच्या काही रेल्वे स्थानकात चोरीच्या घटना वाढल्या होत्या. विशेष करुन प्रवासी जेव्हा लोकल गाडी पकडण्याच्या तयारीत असतात. त्याचवेळी चोरटा त्यांचे मोबाईल हिसकावून पसार होत होता

Gangappa Pujari

अभिजीत देशमुख, कल्याण|ता. २ मार्च २०२४

Kalyan Crime News:

लोकल पकडताना प्रवासांचे मोबाईल हिसकावण्याच्या घटना वारंवार घडत होत्या. पोलिसांनी अधिक तपास करत या आरोपीचा शोध लावला. मात्र पोलिसांनी तपास सुरु केला तेव्हा माहिती पडले की हा चोरटा आधारवाडी कारागृहात आहे. सलमान अन्सारी असे या चोरट्याचे नाव असून त्याने आत्तापर्यंत आठ प्रवाशांचे महागडे मोबाईल लंपास केले होते. कल्याण क्राईम ब्रांच पोलिसांनी त्याच्याकडून आठही महागडे मोबाईल हस्तगत केले आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

काही दिवसांपासून मध्य रेल्वेच्या काही रेल्वे स्थानकात चोरीच्या घटना वाढल्या होत्या. विशेष करुन प्रवासी जेव्हा लोकल गाडी पकडण्याच्या तयारीत असतात. त्याचवेळी चोरटा त्यांचे मोबाईल हिसकावून पसार होत होता. १९ जानेवारी २०२४ रोजी असाच एक प्रकार कल्याण रेल्वे स्थानकात घडल होता. या प्रकरणात कल्याण रेल्वे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला हेाता. रेल्वे पोलिसांसह कल्याण रेल्वे क्राईम ब्रांच पथकानेही या प्रकरणाचा तपास सुरु केला.

पोलीस आयुक्त रविंद्र शिसवे, उपायुक्त मनोज पाटील, कल्याण रेल्वे क्राईम ब्रांचचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक अरशद शेख यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरु करण्यात आला. पोलिसांनी रेल्वे स्थानकातील सीसीटीव्ही फूटेज तपासले असता त्यात सराईत गुन्हेगार सलमान अन्सारी असल्याचे समोर आले. पोलिसांनी सलमानचा शोध सुरु केला. तेव्हा तो आधीच चोरीच्या एका प्रकरणात आधारवाडी कारागृहात असल्याचे समोर आले. पोलिसांनी त्याचा ताबा घेतला.

 (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पोलिसांच्या चौकशीत त्याने याआधी आठ प्रवाशांचे मोबाईल चोरल्याची कबूली दिली. हे सगळे प्रकार कल्याण रेल्वे स्थानकात घडले होते. आता या प्रकरणाचा तपास सुरु आहे. या प्रकरणात वरिष्ठ पोलीस निरिक्षक अर्शद शेख यांच्यासह पोलीस उपनिरिक्षक प्रकाश चौगूले, पोलीस कर्मचारी राजेंद्र दीवटे, जर्नादन पुलेकर, अजय रौंधळ, रविंद्र दरेकर, वैभव जाधव, स्मिता बसावे, पद्मा केंजळे, महेंद्र कर्डीले, रविंद्र ठाकूर, हितेश नाईक, अजित माने, सोनाली पाटील, गाेरख सुरवसे, अक्षय चव्हाण आणि सुनिल मागाडे यांनी हा तपास केला. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Lucky Zodiac Signs: 'या' 5 राशींना पावणार विठुराया; संकटं दूर होतील घरात येईल लक्ष्मी

Maharashtra Live News Update: CM देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पंढरपुरात आरोग्यवारी सोहळा

Boondi Ladoo Recipe: संध्याकाळी लागलेल्या भूकेसाठी झटपट बनवा टेस्टी बुंदी लाडू

Nitesh Rane : विषय थेट अंतरपाटापर्यंत गेला, यांच्यामध्ये नवरदेव कोण अन् नवरी कोण? नितेश राणेंचा खोचक सवाल

Thackeray: पुष्पा ते लाडकी बहीण, मुंबईत ठाकरेंची तोफ धडाडली; उद्धव ठाकरेंच्या भाषणातील ठळक मुद्दे

SCROLL FOR NEXT