Akash Sonar death case Wife affair with her own brother Saam Tv News
क्राईम

Jalgaon Crime : पूजाचं सख्ख्या मावसभावाशी अफेअर, त्यातूनच माझ्या पोराला संपवलं; आकाशच्या आईच्या आरोपांनी जळगावात खळबळ

Jalgaon Aakash Murder News : जळगाव शहरातील कालिका माता मंदिर परिसरात ए वन हॉटेलजवळ शनिवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली होती. आकाश पंडित सोनार असं ३० वर्षीय मयत तरुणाचं नाव आहे.

Prashant Patil

जळगाव : पत्नीच्या नातेवाईकांनी ३० वर्षीय आकाशची हत्या केल्याच्या प्रकरणाला वेगळं वळण मिळालं आहे. घरगुती वादातून पत्नीच्या माहेरच्या लोकांनी तरुणाची हत्या केल्याचं सुरुवातीला बोललं जात होतं. मात्र, पत्नीचे तिच्याच सख्ख्या मावसभावासोबत अनैतिक संबंध असल्यानं तिने नवऱ्याची हत्या घडवून आणली, असा आरोप मयत तरुणाच्या कुटुंबीयांनी केला आहे.

जळगाव शहरातील कालिका माता मंदिर परिसरात ए वन हॉटेलजवळ शनिवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली होती. आकाश पंडित सोनार असं ३० वर्षीय मयत तरुणाचं नाव आहे. आकाशच्या पत्नीच्या नातेवाईकांनी ही हत्या केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी पाच जणांविरोधात शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

दरम्यान, गेल्या अनेक महिन्यांपासून आकाशचा पत्नी आणि तिच्या परिवारासोबत कौटुंबिक वाद सुरु होता. सातत्याने ती माहेरी येत जात असायची काही दिवसांपासून तो पत्नीला घेऊन वेगळा राहत होता. दोघांच्या घरी सतत कौटुंबिक वाद सुरू असायचा. शनिवारी शनिवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास आकाशच्या सासरच्या मंडळींनी आकाशला रस्त्यात गाठलं. कौटुंबिक वादातून आकाशवर संशयित आरोपींनी धारदार शस्त्राने मांडीवर, छातीवर आणि गुप्तांगावर गंभीर वार करून जखमी केलं सोबत दोन राऊंड बंदुकीचे फायर देखील केले.

आकाशच्या पश्चात पत्नीशिवाय आई, दोन मुलं, बहीण, मेहुणा असा परिवार आहे. आकाश ट्रान्सपोर्ट नगरमध्ये गाडी भरण्याचे एजंट म्हणून काम करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

BOI Recruitment: खुशखबर! बँक ऑफ इंडियात नोकरी अन् १.२० लाख रुपये पगार; अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख काय? वाचा

Haldi Kunku Gift Idea : बेस्ट हळदी–कुंक वाण आयडिया, उपयोगी आणि बजेटमध्ये बसणाऱ्या खास वस्तू

Leopard News : बिबट्या अकोल्यात पोहचला, बाळापूरमध्ये ४ पिल्लांसह आढळला, एक शेतकर्‍याच्या हाती लागले, पण...

Maharashtra Live News Update: जळगावच्या सराफ बाजारात चांदीच्या दरात सलग दुसऱ्या दिवशी मोठी वाढ

Namo Shetkari Yojana: नमो शेतकरी योजनेतून ६ लाख शेतकऱ्यांना वगळले? तुम्हाला ₹२००० मिळणार की नाही? असं करा चेक

SCROLL FOR NEXT