Rajasthan Jaipur Couple Video  Saam Tv News
क्राईम

रोमान्स करताना खिडकीचा पडदा टाकायचं विसरले, 'तो' ३० सेकंदाचा व्हिडिओ व्हायरल; हॉटेल व्यवस्थापनाचं उत्तर बुचकळ्यात पाडणारं

Rajasthan Couple Video : जयपूरमधील सिव्हिल लाईन परिसरात असलेल्या एका पंचतारांकित हॉटेलमध्ये हा प्रकार घडला. भारत जोडो पुलावरून नेहमीप्रमाणे वाहनांची वर्दळ सुरू होती. रस्त्यावरून जाणाऱ्या काही लोकांची नजर हॉटेलच्या खिडकीवर पडली.

Prashant Patil

जयपूर : राजस्थानमधील जयपूर शहरात एक धक्कादायक घटना घडली असून, एका पंचतारांकित हॉटेलमधील खोलीत रोमान्स करणार्‍या जोडप्याचा व्हिडिओ रस्त्यावरून जाणाऱ्या लोकांनी आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद करुन सोशल मीडियावर पोस्ट केल्यानं खळबळ उडाली आहे. रोमान्समध्ये तल्लीन झालेलं हे जोडपं खिडकीचे पडदे लावायला देखील विसरले, ज्यामुळे त्यांचा खासगी प्रसंग लोकांच्या कॅमेरात कैद झाला आणि त्यानंतर तो प्रचंड व्हायरल झाला.

कपलचा व्हिडीओ व्हायरल

ही घटना मंगळवारी रात्रीची आहे. जयपूरमधील सिव्हिल लाईन परिसरात असलेल्या एका पंचतारांकित हॉटेलमध्ये हा प्रकार घडला. भारत जोडो पुलावरून नेहमीप्रमाणे वाहनांची वर्दळ सुरू होती. रस्त्यावरून जाणाऱ्या काही लोकांची नजर हॉटेलच्या खिडकीवर पडली. त्यांना जे दिसलं, ते पाहून ते अवाक् झाले, कारण हॉटेलमध्ये रोमान्स करत असलेल्या जोडप्याने खिडकी पडद्याने झाकलीच नव्हती.

लोकांकडून व्हिडीओ शूट

यामुळे, त्यांचा रोमान्स रस्त्यावरून ये-जा करणाऱ्यांना स्पष्टपणे दिसला. त्यानंतर रस्त्यावर लोकांची गर्दी जमायला सुरुवात झाली. लोकांनी मोबाईल काढून लगेच व्हिडिओ शूट करायला सुरुवात केली. या प्रकारामुळे रस्त्यावर वाहतूक कोंडीही झाली होती. या जोडप्याच्या संपूर्ण व्हिडिओ शूट करून तो सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला, जिथे तो प्रचंड व्हायरल झाला.

हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर हॉटेलच्या व्यवस्थापनाकडे याबद्दल माहिती घेण्यात आली. मात्र, त्यांनी दिलेले उत्तर बुचकळ्यात पाडणारे होते. ज्या खोलीत हे जोडपे रोमान्स करताना दिसत होते, ती खोली हॉटेलची नसल्याचं व्यवस्थापनानं सांगितलं. परंतु, तोपर्यंत हॉटेलच्या नावासह हा व्हिडिओ सगळीकडे पसरला होता, ज्यामुळे हॉटेलच्या प्रतिमेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heavy Rain : मुसळधार पाऊस; वारणा धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग, कृष्णेच्या पाणी पातळीत वाढ

Kumbh Rashi : कुंभ राशीचा आजचा रविवार जाणार कसा? वाचा स्पेशल राशीभविष्य

Rohini Khadse: कोण आहे रोहिणी खडसे? जाणून घ्या त्यांच्याविषयी

Maharashtra Live News Update: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांची इच्छा - नितेश राणे

7 minutes after death: मृत्यूनंतर 7 मिनिटांत काय घडतं? पाहा वैज्ञानिक दृष्टीकोनातून समोर आलेल्या धक्कादायक गोष्टी

SCROLL FOR NEXT