Share market  Saam tv
क्राईम

Share Market Scam : क्लासेस घेऊन विश्वास संपादन, नंतर १० टक्के परताव्याचं आमिष; गुंतवणुकीच्या नावाखाली तब्बल सव्वा कोटींची फसवणूक

Dombivli Share Market Scam : शेअर मार्केटचे क्लासेस घेऊन विश्वास संपादन करायचे. त्यानंतर १० टक्के परताव्याचं आमिष द्यायचे. गुंतवणुकीच्या नावाखाली तब्बल सव्वा कोटींची फसवणूक केल्याचं उघड झालं आहे.

Vishal Gangurde

अभिजीत देशमुख, साम टीव्ही

डोंबिवलीत शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या नावाखाली कोट्यवधीचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. 'ग्रोथअप इंडिया' आणि 'अर्थयुक्ती कन्सल्टिंग'कडून कोट्यवधींची फसवणूक केली आहे. या प्रकरणी डोंबिवली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

दुप्पट तिप्पट दहापट परताव्याचे आम्हीच दाखवून गुंतवणूकदारांची कोठे आणि त्यांचे फसवणूक झाल्याच्या घटना याआधी देखील उजेडात आल्या आहेत. टोरेस घोटाळा ताजा असतानाच डोंबिवलीत शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या नावाखाली कोट्यवधीची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

'शेअर मार्केट'मध्ये मोठा परतावा देतो म्हणत 'ग्रोथअप इंडिया' आणि 'अर्थयुक्ती कन्सल्टिंग'च्या नावाखाली तब्बल 1 कोटी 23 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी डोंबिवली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी फसवणूक करणाऱ्या तिघांना अटक केली आहे. अनिकेत मुजुमदार, संदेश जोशी आणि संकेत जोशी अशी तिघांची नावे आहेत.

डोंबिवली पूर्वेकडील स्टेशन परिसरात ग्रोथअप इंडिया' आणि 'अर्थयुक्ती कन्सल्टिंग' या क्लासेसच्या माध्यमातून आधी विद्यार्थ्यांना शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याचे क्लासेस घेतले जायचे. त्यानंतर त्यांचे आणि त्यांच्या कुटुंबाचे विश्वास संपादन करून त्यांना शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीवर दरमहा 10 टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवून त्यांची फसवणूक करायचे. काही गुंतवणूकदारांनी या ठिकाणी पैसे गुंतवले मात्र बरेच महिने उलटूनही परतावा न मिळाल्याने त्यांना आपले फसवणूक झाल्याचे लक्षात आले आहेत. याप्रकरणी त्यांनी डोंबिवली रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली.

डोंबिवली रामनगर पोलिसानी 8 ते 9 जणांच्या फिर्यादी वरुण विविध कलमा अंतर्गत गुन्हा दाखल करत दोन आरोपींना ताब्यात घेत एका फरार आरोपीचा शोध सुरू केला आहे. फसवणुकीचा आकडा मोठ्या प्रमाणात वाढणार आहेत. नागरिकांनी अशा प्रकारे शेअर मार्केटिंग, डिजिटल अरेस्ट, जास्त पैसे देण्याच्या आमिषाला बळी न पडता अशा पकारे कोणी फसवत असेल तर त्याची माहिती पोलिसांना द्यावी, असे आवाहन पोलिसांकडून केले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Devendra Fadnavis : 'महाराष्ट्रात अशी गुंडगिरी करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल'; मीरा रोडच्या घटनेवरुन CM देवेंद्र फडणवीस संतापले

Crime: 'महिलेला भूतबाधा झाली' सासरच्यांना बाहेर बसवलं, मांत्रिकांकडून गर्भवती महिलेवर सामूहिक बलात्कार

CM Fadnavis: देवेंद्र फडणवीसांना दिलासा; याचिकेतून विधानसभा निवडणुकीतील विजयाला दिलं होतं आव्हान

Maharashtra Live News Update: धाराशिवात १७ मुलींना झाली विषबाधा

The Hunt: माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येवर आधारित 'द हंट' ही मालिका तुम्ही कधी आणि कुठे पाहू शकता?

SCROLL FOR NEXT