Hyderabad Crime Saam tv
क्राईम

Hyderabad Crime: मैत्रीत दगा! नोकरी मिळाल्याच्या आनंदात दिली पार्टी, क्लबमध्ये मित्रांनीच मैत्रिणीवर केला सामूहिक अत्याचार

Bharat Jadhav

हैदराबादमध्ये एक धक्कादायक घटना घडलीय. एका सॉफ्टवेअर अभियंता मुलीने नवीन नोकरी लागल्याचा आनंद साजरा करण्यासाठी त्याच्या दोन मित्रांना तिच्या घरी बोलावले. पण तिचा हा आंनदोत्सव भयावह ठरला. या दोन मित्रांनी मिळून महिला अभियंत्रेवर सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडलीय.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सॉफ्टवेअर इंजिनिअरवर मुलीने तिच्या बालपणीच्या मित्राला आणि एका कॉमन फ्रेंडला नोकरी मिळाल्याबद्दल पार्टी दिली. या दोघांनीच त्या मुलीला हैदराबादमधील एका हॉटेलमध्ये नेत तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. सॉफ्टवेअर इंजिनीअरने पोलिसांना सांगितले की, तिला नोकरीसाठी ऑफर लेटर मिळाले होते. हे सेलिब्रेट करण्यासाठी तिने तिच्या बालपणीचा मित्र गौतम रेड्डी आणि आणखी एका मित्रांला पार्टी दिली. हैदराबादच्या वनस्थलीपुरम येथील एका बारमध्ये हे तिघे सेलिब्रेशन करायला गेले होते, अशी माहिती पीडितेने दिलीय.

ते तिघे एका हॉटेलला लागून असलेल्या बार आणि रेस्टॉरंटमध्ये गेले. रेड्डी आणि त्याचा मित्र दारूच्या नशेत होते. त्या दोघांनी पीडितेला हॉटेलच्या खोलीत नेले आणि तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. पीडिता आणि आरोपी रेड्डी इयत्ता २ ते इयत्ता १० पर्यंत एकाच शाळेत एकत्र शिकलेत. पीडित महिला आणि गौतम रेड्डी २९ जुलै रोजी ओंकार नगर येथील बोमारिल्लू ग्रँड रेस्टॉरंटमध्ये गेले होते. पीडित तरुणीही दारूच्या नशेत होती.

बलात्कारानंतर शुद्धीवर आल्यावर ती जोरजोरात ओरडू लागली. त्यावेळी गौतम रेड्डी खोलीत होते. मुलीचा आरडाओरडा ऐकून हॉटेलचे कर्मचारी खोलीत पोहोचले. कर्मचारी रुमपर्यंत येईपर्यंत दोघे आरोपीही घटनास्थळावरून पळून गेले. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Live Updates : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या दिल्लीला जाण्याची शक्यता

वेडा झालाय का? चक्क वाघाच्या पाठीवर बसून फेरफटका, पाकिस्तानमधला Video Viral, नेटकऱ्यांमध्ये संताप

NCLT सोमवारी राकेश वाधवान यांच्या याचिकेवर करणार सुनावणी, काय आहे प्रकरण?

Fraud Case : व्यापाऱ्याची १३ लाखात फसवणूक; नागपूरच्या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

Assembly Election : सलील देशमुख विधानसभा लढवणार? पाहा Video

SCROLL FOR NEXT