Mumbai Crime News Saam Tv
क्राईम

Shifting Company Fraud : घराची शिफ्टिंग लय महागात पडली; शिफ्टिंग कंपनीच्या कर्मचाऱ्यांचा सोन्यावर डल्ला

Mumbai Crime News : मुंबईतील सायन परिसरात घर शिफ्टिंगदरम्यान ६.८ लाख किमतीचे सोनं चोरीला गेल्याची घटना घडली आहे. शिफ्टिंग कंपनीच्या चार कर्मचाऱ्यांविरुद्ध सायन पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपी फरार आहेत.

Alisha Khedekar

  • सायनमध्ये शिफ्टिंगदरम्यान ६.८ लाखांचे सोनं चोरीला गेलं

  • मेहता कुटुंबाची फसवणूक झाली असून पोलिसांकडे तक्रार दाखल

  • आरोपी प्रवीण पांडेसह चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल

  • पोलिसांकडून तपास सुरू असून संबंधित कंपनीवर आधीही चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता

मुंबईतील सायनमधून धक्कदायक बातमी समोर आली आहे. सायनमध्ये एका कुटुंबाला घराची शिफ्टिंग करणं महागात पडलं आहे. शिफ्टिंग कंपनीतील कर्मचाऱ्याने एका कुटुंबाचे सामान हलवताना ₹६.८ लाख किमतीचे सोन्याचे दागिने घेऊन पळून गेले. सायन पोलिसांनी या प्रकरणी चार आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार श्रद्धा मेहता (५५) आणि त्यांचे पती धर्मेश मेहता (५८) २०२२ पासून सायन येथील दोस्ती एलिटमध्ये भाड्याने राहत आहेत. त्यांची मुले परदेशात काम करतात. अलीकडेच, त्यांचा भाडे करार संपल्याने, या जोडप्याने फ्लॅट रिकामा करून सायनमधील तमिळ संगम रोडवरील शांती टॉवर येथील धर्मेशच्या भावाच्या मालकीच्या घरात राहण्याचा निर्णय घेतला.

१५ ऑक्टोबर रोजी श्रद्धा मेहता यांनी प्रवीण पांडे नावाच्या एका व्यक्तीशी संपर्क साधला, जो शिफ्टिंग सेवा देत होता. त्यांनी त्यांचे सामान पॅक करण्यासाठी बॉक्स पाठवले, जे जोडप्याने घरातील वस्तूंनी भरले. श्रद्धा आणि तिच्या घरकाम करणाऱ्या विद्या सावंत हिने त्यांचे सोन्याचे दागिने एका ट्रॅव्हल बॅगेत ठेवले होते. त्यानंतर प्रवीण पांडे हा त्याच्या सहकाऱ्यांसह मेहता यांच्या घरी पोहचला आणि मेहता यांच सर्व वस्तू नवीन ठिकाणी हलवल्या.

१६ ऑक्टोबर रोजी सामानाची तपासणी करताना मेहता कुटुंबाला आढळले की ६.८ लाख रुपयांचे दागिने असलेली ट्रॅव्हल बॅग गायब आहे. पांडेचा फोन बंद असल्याने त्याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न अयशस्वी झाला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच श्रद्धाने सायन पोलिस स्टेशनशी संपर्क साधला आणि तक्रार दाखल केली.मेहता कुटुंबियांच्या तक्रारीनंतर संबंधित शिफ्टिंग कंपनीबाबत तक्रार नोंदवण्यात आली आहे. दरम्यान या शिफ्टिंग कंपनीबाबत याआधीही चोरीची तक्रार करण्यात आली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

MLC Election: मोठी बातमी! विधानपरिषदेसाठी ठाकरेसेनेकडून यादी जाहीर, कुणाला कुठे मिळाली संधी?

High blood pressure: रोजच्या ताटातले हे 6 पदार्थ वाढवतायत तुमचं ब्लड प्रेशर

निवडणूक आयोगाचा भयंकर गोंधळ! पदवीधर मतदार यादीत थेट उद्धव ठाकरेंचे नाव; राजकीय वर्तुळात खळबळ

8th Pay Commission: 2027 मध्ये सॅलरी वाढली तर 2026 च्या पैशांचं काय? 8व्या वेतन आयोगाबाबत महत्त्वाची अपडेट

SCROLL FOR NEXT