Gujarat Crime Saam Tv
क्राईम

Shocking: आधी बायकोला नंतर गर्लफ्रेंडला संपवलं, भात गिरणीत नग्न अन् रक्ताच्या थारोळ्यात आढळला मृतदेह

Gujarat Crime: २५ वर्षीय तरुणाने आधी बायकोची हत्या केली अन् मृतदेह भात गिरणीत लपवून ठेवला. त्यानंतर ३ महिन्यांनी त्याने गर्लफ्रेंडची देखील त्याच ठिकाणी हत्या केली. पोलिसांनी १०० सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर आरोपीला अटक केली.

Priya More

Summary -

  • गुजरातच्या नवसारी जिल्ह्यात दुहेरी खून प्रकरण उघड

  • फैजल पठाणने बायको आणि गर्लफ्रेंडची हत्या केली

  • दोन्ही मृतदेह भात गिरणीत सापडले

  • मृतदेह नग्न आणि रक्ताच्या थारोळ्यात पडला होता

गुजरातमध्ये एका तरुणाने आधी आपल्या बायकोची हत्या केली त्यानंतर त्याने गर्लफ्रेंडला देखील संपवलं. या घटनेमुळे गुजरात हादरले आहे. गुजरातमधील नवसारी जिल्ह्यात ही घटना घडली. राष्ट्रीय महामार्ग -४८ जवळ एका महिलेचा नग्न आणि रक्तबंबाळ अवस्थेतील मृतदेह आढळून आला होता. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत तपास सुरू केला होता. या तपासादरम्यान एक धक्कादायक माहिती समोर आली. पोलिसांनी आरोपी फैजल नासिर पठाणला अटक केली. त्याने एक नाही तर दोन जणाची हत्या केल्याची कबुली दिली. आरोपी गुजरातच्या बारडोली येथील रहिवासी आहे.

आरोपी फैजलने चौकशीदरम्यान कबूल केले की, हा मृतदेह त्याची गर्लफ्रेंड रियाचा आहे. त्याने २८ ऑक्टोबर रोजी रियाची हत्या केली होती. आर्थिक वादातून त्याने हे कृत्य केल्याचे तपासातून उघड झाले. महिलेचा मृतदेह सापल्यानंतर पोलिसांनी तपास करत असताना सीसीटीव्ही फुटेज तपासले. तेव्हा पोलिस आरोपीपर्यंत पोहचले. अटकेनंतर आरोपीने चौकशीदरम्यान असेही सांगितले की, तीन महिन्यांपूर्वी त्याने त्याची बायको सुहानाचीही हत्या केली.

आरोपीने ज्याठिकाणी बायकोची हत्या केली होती त्याच ठिकाणी गर्लफ्रेंडची हत्या केली होती. भात गिरणीत त्याने बायकोची हत्या करून मृतदेह लपवून ठेवला होता. त्याच ठिकाणी त्याची गर्लफ्रेंड रियाचा देखील मृतदेह सापडला. पोलिसांनी आरोपीला घटनास्थळी नेले तेव्हा त्याची बायको सुहानाच्या मृतदेहाचा सांगाडा पोलिसांना सापडला. तो सांगाडा पोलिसांनी ताब्यात घेतला. दोन्ही मृतदेह फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी फैजल पठाणविरोधात दुहेरी हत्याकांडाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

पोलिसांनी सांगितले की, नवसारी येथील राष्ट्रीय महामार्ग- ४८ जवळील एका बंद भात गिरणीत महिलेचा नग्न अवस्थेत मृतदेह आढळून आला होता. पोलिसांनी १०० पेक्षा अधिक सीसीटीव्ही तपासले. त्यात बारडोली येथील २५ वर्षीय रहिवासी फैजल पठाणला ताब्यात घेत त्याची चौकशी केली. तर आरोपीने गर्लफ्रेंड आणि बायकोच्या हत्येची कबुली दिली. आरोपीने ज्याठिकाणी गर्लफ्रेंडला संपवलं त्याच ठिकाणी त्याने ३ महिन्यापूर्वी बायकोलाही संपवलं होतं. आरोपीची गर्लफ्रेंड कचरा वेचण्याचे काम करत होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ITR filing: ITR भरण्यासाठी उरले २४ तास; फक्त १० मिनिटांत घरबसल्या रिटर्न भरा, वाचा स्टेप-बाय-स्टेप प्रोसेस

Maharashtra News Live Update: ठाकरेंच्या शिवसेनेचे नगरसेवक महापौरांच्या दालनात शिरले

Railway Accident : नागपुरात भयंकर दुर्घटना! रेल्वे रुळावर २ भावांचे मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत आढळले; नेमके काय घडले?

ठाण्याच्या विकासाला नवी झळाळी! सिद्धेश्वर तलावाजवळील ५० एकरांहून अधिक क्षेत्रात उभारणार ‘ग्रेड A+’ व्यावसायिक प्रकल्प

पंढरपूरच्या वारीवरून परतताना काळाचा घाला! ३ वाहनांचा भीषण अपघात; एका वारकऱ्याचा मृत्यू, ११ गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT