Hingoli Crime Saam TV
क्राईम

Hingoli Crime : मोक्षप्राप्तीसाठी जिवंतपणी सुरू केली मृत्यूची तयारी; हिंगोलीत अंधश्रद्धेची संतापजनक घटना

Hingoli Black Magic News: राज्यात शिक्षणाचा आणि विज्ञानाचा कितीही प्रसार आणि प्रचार सुरू असला तरी देखील अद्याप अनेक ठिकाणी लोक अंधश्रद्धेचे बळी ठरत आहेत. हिंगोलीसह विद्येचं माहेरघर समजल्या जाणाऱ्या पुण्यातही काही दिवसांपूर्वी अशीच एक घटना घडली होती.

संदिप नागरे

Hingoli News :

मला स्वर्गामध्ये मोक्षप्राप्ती मिळवायची आहे, म्हणत हिंगोलीत एका नागरिकाने स्वतःच्या मृत्यूची जिवंतपनी तयारी सुरू केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. हिंगोली तालुक्यातील बासंबा पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या लींबी गावात अंधश्रद्धेचा किळसवाणा प्रकार समोर आला आहे. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

धोंडबाराव देवकते असं अंधश्रद्धेचा किळसवाना प्रकार करणाऱ्या व्यक्तीचं नाव आहे. धोंडबाराव याने स्वतःच आपल्या मृत्यूची कहाणी लिहिली. या व्यक्तीला पाहण्यासाठी आता लिंबी गावासह परिसरातील शेकडो गावकऱ्यांनी गर्दी केली आहे. विशेष म्हणजे काही महिलांनी या व्यक्तीची पूजाअर्चा करायला देखील सुरुवात केली आहे.

परिसरातील काही गावकऱ्यांनी या व्यक्तीची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र दोन वाजून 57 मिनिटांनी आपला मृत्यू अटळ आहे, म्हणत हा व्यक्ती एकाच जागेवर बसून आहे. दरम्यान हा गंभीर प्रकार घडत असताना पोलिसांना मात्र अद्याप देखील या घटनेची कल्पनाच नसल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

राज्यात शिक्षणाचा आणि विज्ञानाचा कितीही प्रसार आणि प्रचार सुरू असला तरी देखील अद्याप अनेक ठिकाणी लोक अंधश्रद्धेचे बळी ठरत आहेत. हिंगोलीसह विद्येचं माहेरघर समजल्या जाणाऱ्या पुण्यातही काही दिवसांपूर्वी अशीच एक घटना घडली होती. मित्राच्या मृत्यूसाठी अघोरी पूजा करण्यात आली होती.

काही महिन्यांपूर्वी प्रतिस्पर्धी मित्राचा मृत्यू होण्याकरता स्मशान भूमीमध्ये जाऊन अघोरी पूजा करून,पूजेचा व्हिडिओ मित्राला पाठवल्याची घटना लोणी काळभोर परिसरात घडली होती. पोलिसांना याची महिती मिळताच त्यांनी आरोपी तरुणाला ताब्यात घेतलं होतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident : बायपासवर भीषण अपघात! ३ वाहनांची जोरदार धडक, ४ जणांचा होरपळून मृत्यू

१६ महिन्यांत ३६ जणांना मृत्युदंड, 'त्या' न्यायाधीशांची तडकाफडकी कौटुंबिक न्यायालयात बदली

Maharashtra News Live Update: जुन्या कसारा घाटात वाहतूक कोंडी

Tikhat Sev Recipe: दिवाळीला फराळ करताना घरी बनवा कुरकुरीत आणि झणझणीत तिखट शेव, वाचा रेसिपी

Drinks for Liver Health: यकृतावर घाणेरडी चरबी जमा झालीये? हे ६ ड्रिंक्स लिव्हर डिटॉक्स करण्यास ठरतील फायदेशीर

SCROLL FOR NEXT