Hingoli DCC Bank fight between farmers and employees Saam Tv News
क्राईम

Hingoli News : पिक विम्याचे पैसे काढण्यासाठी शेतकरी बँकेत, कर्मचाऱ्यांची दुय्यम वागणूक; अधिकाऱ्याचं डोकंच फोडलं

Hingoli Bank Fight Video : सुरुवातीला शाब्दिक चकमक सुरू होऊन नंतर थेट बँकेत हाणामारी सुरू झाली. या घटनेत एका बँक कर्मचाऱ्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. ओम काळे असं या जखमी कर्मचाऱ्याचं नाव आहे.

Prashant Patil

हिंगोली : हिंगोलीच्या डीसीसी बँकेमध्ये शेतकरी आणि बँक कर्मचाऱ्यांमध्ये तुफान राडा झाला आहे. पिक विम्याचे पैसे काढण्यासाठी आलेल्या शेतकऱ्यांना बँकेतील कर्मचारी दुय्यम वागणूक देत असल्याचा आरोप करत शेतकरी संतप्त झाले होते. दरम्यान, सुरुवातीला शाब्दिक चकमक सुरू होऊन नंतर थेट बँकेत हाणामारी सुरू झाली. या घटनेत एका बँक कर्मचाऱ्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. ओम काळे असं या जखमी कर्मचाऱ्याचं नाव असून त्याच्यावर हिंगोलीच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

हाणामारीची घटना घडल्यानंतर बँकेत चौकशी करण्यासाठी गेलेल्या पोलिसांना डीसीसी बँकेत धक्कादायक प्रकार आढळला आहे. सुरक्षेच्या दृष्टीने बँकेत लावण्यात आलेले सर्व सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याचं देखील आता पुढे आलं आहे. त्यामुळे कोट्यावधी रुपयांची उलाढाल असलेल्या बँकेची सुरक्षा देखील वाऱ्यावर असल्यानं सर्वसामान्य कर्मचारी आणि शेतकऱ्यांच्या पैशाचं संरक्षण करणार कोण? असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे.

मौजमजेसाठी सोनसाखळी, दुचाकी चोरी

दरम्यान, मौजमजा करण्यासाठी सोन साखळी आणि दुचाकी चोरी करण्यास सुरवात केली. चोरलेल्या दुचाकी व सोन्याच्या चैन विक्री करून त्यातून मिळणाऱ्या पैशातून मौज केली जात होती. अशा प्रकारे चोरी करणाऱ्या या टोळीचा नाशिकच्या गंगापूर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. तसेच या टोळीकडून चोरीचे सोने खरेदी करणाऱ्या सराफ व्यावसायिकाला देखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

नाशिकच्या गंगापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मागील दोन दिवसात तीन सोनसाखळी चोरीच्या घटना घडल्या होत्या. या प्रकरणी पोलिसात तक्रार करण्यात आल्या होत्या. यानंतर गंगापूर पोलिसांनी तपासाचे चक्र फिरवत सोन साखळी चोरी करणाऱ्या टोळीला गजाआड केले आहे. यामध्ये तीन अल्पवयीन मुलासंह तिघांचा समावेश आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jamner Accident : भरधाव डंपरने तरुणाला चिरडले; संतप्त ग्रामस्थांचा मृतदेहासह रास्ता रोको

Maharashtra Live News Update: अन्यथा दसरा मेळाव्याला मोठा निर्णय घ्यावा लागेल- मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा

Ashwini Kedari: PSI मध्ये मुलींमध्ये पहिली, IAS होण्याचं स्वप्न पण अश्विनी केदारींवर काळाचा घाला, अवघ्या ३०व्या वर्षी मृत्यू

सचिन तेंडुलकर बीसीसीआयचा अध्यक्ष होणार? कारणही आले समोर आले

गर्ल्स हॉस्टेल बनलं देहविक्रीचा अड्डा; व्हॉट्सअ‍ॅपवर डील अन् मोठी रक्कम, १० तरूणींसह ११ जण ताब्यात

SCROLL FOR NEXT