Hingoli Crime Saam TV
क्राईम

Hingoli Crime : खळबळजनक! व्हिडिओ रेकॉर्ड करत विवाहित महिलेने संपवलं जीवन; धक्कादायक कारण आलं समोर

Hingoli Crime News : आत्महत्येपूर्वी महिलेने आपला एक व्हिडिओ रेकॉर्ड केला. यात तिने तिन्ही तरुणांची नावे घेतली आहेत. या तिघांनी मला ब्लॅकमेल करत माझ्यावर अत्याचार केला, असं तिने म्हटलंय.

Ruchika Jadhav

भरत नागरे

हिंगोलीच्या गोरेगाव पोलीस स्टेशन हद्दीमध्ये एक संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. एका विवाहित महिलेने टोकाचा निर्णय घेत आत्महत्या केली आहे. आत्महत्येपूर्वी तिने एक व्हिडिओ रेकॉर्ड केला आहे. या व्हिडिओमधून हत्येमागचं धक्कादायक कारण समोर आलं आहे.

पोलिसांनी दिलेल्या अधिक महितीनुसार, तीन तरुण या महिलेला सतत ब्लॅकमेल करत होते. तसेच तिच्यावर वारंवार अत्याचार करत होते. या त्रासाला कंटाळून तिने थेट आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला.

आत्महत्येपूर्वीच्या व्हिडिओत काय?

आत्महत्येपूर्वी महिलेने आपला एक व्हिडिओ रेकॉर्ड केला. यात तिने तिन्ही तरुणांची नावे घेतली आहेत. या तिघांनी मला ब्लॅकमेल करत माझ्यावर अत्याचार केला. त्यांच्या रोजच्या त्रासाला मी पूर्णत: कंटाळले, त्यामुळे मी आत्महत्या करत आहे. या तिघांना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी महिलेने व्हिडिओमध्ये केली आहे.

माझे पती किंवा घरच्यांना या प्रकरणात दोषी धरू नये. माझ्यावर अत्याचार करणाऱ्या गुन्हेगारांना शिक्षा व्हावी असं मला वाटतं, असंही महिलेने व्हिडिमध्ये म्हटलं आहे. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.

दरम्यान, पोलीस तपासात त्यांच्या हाती हा व्हिडिओ लागला. गोरेगाव पोलिसांनी या प्रकरणात दोन आरोपींना अटक केली आहे. अत्याचार करणाऱ्या तीन तरुणांवर बलात्कारासह आत्महत्येस परावृत्त केल्याचा गुन्हा देखील दाखल करण्यात आल्याची माहिती गोरेगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रवी हुंडेकर यांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monday Horoscope : दिवसभरात मोठा निर्णय घेणे टाळा, मनातील इच्छा पूर्ण होतील; ५ राशींच्या लोकांची स्वप्न होणार पूर्ण

Crime: विवाहित महिलेवर सामूहिक बलात्कार, गॅस सिलिंडर देतो म्हणत सोबत नेलं; अत्याचार करत व्हिडीओ काढले अन्...

शौर्यगाथा कार्यक्रमावरून राजकारण तापलं; मनसे नेते राजू पाटील यांचा भाजपवर जोरदार निशाणा

LPG Rule Change: सर्वसामान्यांना मोठा झटका, गॅस सिलिंडरच्या नियमात बदल

मातृदिनी आई हळहळली! तुळजापुरात 19 वर्षीय तरुणाची हत्या|VIDEO

SCROLL FOR NEXT