Husband kills wife India Saam TV
क्राईम

Crime News: व्यायामामुळे बायको झाली फिट; जिमवरून येताच नवऱ्याने केली हत्या, सनकी 7 तास मृतदेहाजवळ बसून राहिला

Husband kills wife India: उत्तर प्रदेशातील मुरादाबादमध्ये पतीने पत्नीच्या जिमला जाण्यावरून वाद करत तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपीने लोखंडी रॉडने हल्ला करत गुन्ह्याची कबुली दिली असून पोलिस तपास सुरू आहे.

Surabhi Jayashree Jagdish

उत्तर प्रदेशातून एक धक्कादायक आणि मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. यामध्ये पती आणि पत्नी यांच्या नात्यातील वाद टोकाला गेला. पत्नी जीमला जाते आणि फीट राहते हे पतीने आवडत नसल्याने त्याने पत्नीची हत्या केल्याचं समोर आलं आहे. युपीच्या मुरादाबाद जिल्ह्यात ही घटना घडली असून आजूबाजूच्या परिसरात मोठी खळबळ माजली आहे.

नेमकं काय घडलं?

शोभित नावाच्या स्क्रॅप व्यायसायिकाने त्याची पत्नी पूनम हिची हत्या केल्याचं समोर आलंय. मिळालेल्या माहितीनुसार, पत्नी फीट राहते तसंच जीमला जाते हे पतीला मान्य नव्हतं. या कारणामुळे दोघांमध्ये नेहमी वाद व्हायचे.

गुरुवारच्या दिवशी पूनम जीमवरून घरी आली. त्यावेळी या जोडप्यामध्ये वाद झाला. हा वाद इतका टोकाला केला की त्याने रागाच्या भरात शटर उघडण्यासाठी वापरण्यात येणारं जड रॉडने पूनमच्या डोक्यावर वार केला. हा वार इतका जोरात होता की, पूनमचा जागीच मृत्यू झाला.

७ तास पत्नीच्या मृतदेहाजवळ बसून होता

दरम्यान ही घटना घडल्यानंतर शोभित पळून गेला नाही. तो जवळपास ७ तास तिच्या मृतदेहापाशी बसून राहिला. जेव्हा दुपारी त्यांची मुलगी घरी आली तेव्हा तिने आई कुठेय असं विचारलं. शोभितने तिला बहाणा करून दुसऱ्या खोलीत पाठवलं. परंतु संध्याकाळ होताच त्याने जखमी झालेल्या पत्नीची माहिती पोलिसांना दिली आणि ॲम्ब्युलन्सही बोलावली.

अपघात भासवण्याचा प्रयत्न

आरोपीला हा प्रकार एक अपघात असल्याचं भासवायचं होतं. पोलिसांनी मात्र घटनास्थळी पोहोचताच महिलेचा मृतदेह बेडवर पाहिला आणि त्यांना संशय आला. यावेळी त्यांनी शोभितला ताब्यात घेतलं आणि चौकशी केली. यावेळी शोभितने आपण केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली.

प्रकरणाला वेगळं वळण

ज्यावेळी पूनमच्या माहेरच्या लोकांनी गंभीर आरोप केले तेव्हा या प्रकरणाला वेगळं वळण मिळालं. पूनमच्या भावाच्या म्हणण्यानुसार, हा वाद केवळ जीमवरून जाण्याचा नव्हता. त्याच्या बहिणीला यापूर्वीही सासरी खूप छळाचा सामना करावा लागला होता. यापूर्वी तिला काच पावडर खायला देऊन जीवे मारण्याचा प्रयत्न केला गेला होता. त्यावेळी तिच्या गाल आणि जीभेला जखम झाली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीला अटक करण्यात आली असून पुढची चौकशी आणि तपास सुरु आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shilpa Shinde: 'अंगूरी भाभी' जेलमध्ये जाणार? प्रोड्यूसरवर हरेसमेंटचे खोटे आरोप भोवले, अभिनेत्रीच्या अटकेची मागणी

Pune Hospital: पुण्यातील आरोग्य विभाग 'व्हेंटिलेटर'वर, पालिका रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टरांचा तुटवडा; धक्कादायक आकडेवारी समोर

एक नंबरचे स्वार्थी आणि ढोंगी असतात 'ही' माणसं! आचार्य चाणक्यांनी सांगितलेल्या 'या' २ सवयींवरून ओळखा

Maharashtra News Live Update: नांदेड जिल्ह्यात मान्सून पूर्व पावसाचे दमदार आगमन

Mumbai Crime : मुंबईत भयंकर घडलं! आईच्या बॉयफ्रेंडचं टाळकं सटकलं, अमानुष मारहाणीत ४ वर्षाच्या मुलाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT