लग्नाला नकार दिल्याने राग डोक्यात घेत प्रेयसीला जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका व्यक्तीला पोलिसांनी अटक केलीय. मिंटू कुमार असं हत्येचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीचं नाव आहे. प्रेयसीसमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवल्यानंतर महिलेने नकार दिला. नकार मिळाल्यानं तरुणाचा राग अनावर झाला आणि त्यांनी प्रेयसीचा जीव घेण्याचा प्रयत्न केला. ही घटना गुरुग्राममध्ये घडलीय.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी हा बिहारमधील रहिवाशी आहे, त्याचं नाव मिंटु कुमार आहे. सेक्टर -७ मधील आयएमटी मानेसर येथील पोलिसांना कासन गावातील डोंगरात एक महिला जखमी अवस्थेत पडली असल्याची माहिती मिळाली. माहिती मिळताच पोलीस पथकाने पीडितेला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. तपास पथक रुग्णालयात पोहोचले तेव्हा जखमी महिला काहीही बोलण्याच्या मनस्थितीत नव्हती.
घडलेल्या घटनेचा तपास करण्यासाठी पोलीस पथकाने घटनास्थळकडे धाव घेतली. फिंगरप्रिंट आणि श्वान पथकासह घटनास्थळाची पाहणी केली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच ४ मार्च रोजी पीडितेने पोलीस पथकाला लेखी जबाब दिला. यात तिने सांगितले की, ती भांगरोला गावात भाड्याच्या घरात राहते. आयएमटी मानेसरच्या सेक्टर-८ मध्ये असलेल्या कंपनीत काम करत असल्याचं सांगितलं. तेथे तिची ओळख मिंटू नावाच्या एका व्यक्तीसोबत झाली.
दोन मार्च रोजी पीडिता मिंटू आणि तिच्या मैत्रिणीसह कासन गावात असलेल्या मंदिरात दर्शनासाठी गेली होती. नंतर ती आणि मिंटू यांनी तिच्या मित्राला मंदिरात राहण्यास सांगितलं. नंतर ते दोघे कासन गावातील डोंगरावर फिरायला गेले. तेथे मिंटूने तिला लग्नाची मागणी घातली, मात्र तिने नकार दिला.
गुरुग्राम पोलिसांचे प्रवक्ते संदीप कुमार यांनी सांगितले की, मिंटूने जेव्हा लग्नाची मागणी घेतली, त्यावेळी पीडितेने त्याला नकार दिला. नकार ऐकताच मिंटूला राग आला आणि रागात त्याने तिला खाली पाडले. त्यानंतर तिच्या पोटात आणि पाठीवर लाथा बुक्यांनी मारहाण केली. तेथे पडलेल्या दगडाने तिच्यावर हल्ला केला.
दगडाने त्याने तिच्या चेहऱ्यावर हल्ला केला. गंभीर जखमी झालेल्या पीडिता बेशुद्ध झाली. मिंटूला वाटलं की, ती मृत पावलीय. तिला मेलेलं समजून मिंटूने तेथून पळ काढला. रातभर ती महिला जखमी अवस्थेत पडून राहिली होती. दुसऱ्या दिवशी एका व्यक्तीला एक महिला जखमी अवस्थेत पडलेली दिसली त्यांनी गु्रुग्राम येथील सेक्टर ७ आयएमटी मानेसर येथील पोलीस ठाण्यात संपर्क साधत याबाबत माहिती दिली.
त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत याप्रकरणाचा तपास ,सुरू केला. याप्रकरणी मानेसर पोलीस ठाण्यात संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल केला. तपासादरम्यान गुरुग्राम पोलिसांच्या मानेसर गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने सोमवारी औरंगाबाद (बिहार) येथून आरोपीला अटक केली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.