Madhya Pradesh Crime  Saam Tv
क्राईम

Crime: अरविंदचं तिसरं लग्न, नंदिनीचा पाचवा नवरा; भररस्त्यात डोक्यात गोळ्या झाडल्या, फेसबुकवर लाईव्ह करत...

Nandini Killed Case: मध्य प्रदेशमध्ये एका तरुणाने आपल्या बायकोची भररस्त्यात गोळ्या झाडून हत्या केली. डोक्यात चार गोळ्या लागल्यामुळे महिलेचा मृत्यू झाला. आरोपीने बायकोची हत्या केल्यानंतर फेसबुक लाईव्ह देखील केले होते.

Priya More

मध्य प्रदेशच्या ग्वालियरमध्ये प्रेमाचा भयंकर शेवट झाला. एका तरुणाने आपल्या बायकोची भररस्त्यात डोक्यात गोळ्या झाडून निर्घृण हत्या केली. बायकोची हत्या करून तो त्याठिकाणीच बसून राहिला. त्यावेळी त्याने फेसबुक लाईव्ह देखील केले. या हत्याकांडाची सध्या देशभरात चर्चा होत आहे. अरविंद परिहार असं आरोपीचे नाव असून त्याने नंदिनीची हत्या केली. अरविंद आणि नंदिनीचे लव्ह मॅरेज होते.

मिळालेल्या माहितीनुसार, अरविंद परिहारने नंदिनीची डोक्यामध्ये गोळ्या झाडून हत्या केली. त्याने नंदिनीवर ५ गोळ्या झाडल्या त्यामधील चार गोळ्या तिला लागल्या. गोळ्या झाडल्यानंतर प्रचंड रक्तस्राव होऊ लागल्यामुळे नंदिनी जमिनीवर कोसळली. ती मदतीसाठी विनवनी करत होती. त्यावेळी आरोपी अरविंद हातामध्ये बंदूक घेऊन फेसबुकवर लाईव्ह करत होता.

नंदिनीने काही दिवसांपूर्वी पोलिस ठाण्यात धाव घेत अरविंदविरोधात तक्रार दाखल केली होती. अरविंद आधीच विवाहित होता आणि त्याने फसवणूक करून तिच्याशी दुसरे लग्न केले. जेव्हा तिने याचा विरोध केला तेव्हा अरविंद आणि त्याची मैत्रीण पूजा परिहार यांनी तिच्यावर हल्लाही केला. नंदिनीने असेही सांगितले होते की, अरविंदने तिला आणि तिच्या कुटुंबाला अनेकदा नुकसान पोहोचवण्याचा प्रयत्न केला होता. एकदा ती तिचा मुलगा आणि आईसोबत सिरोल पोलिस स्टेशनजवळ जात असताना अरविंदने पाठीमागून गाडीने धडक देत त्यांना चिरडण्याचा प्रयत्न केला. नंदिनी गंभीर जखमी झाली तर तिची आई आणि मुलगा देखील जखमी झाला होता.

नंदिनीने अरविंद आणि पूजावर तिचे अश्लिल फोटो आणि व्हिडीओ व्हायरल केल्याचा आरोप केला. पोलिसांनी नंदिनीच्या तक्रारीवरून अरविंदविरोधात हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. तरी देखील तो नंदिनीवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत होता. धक्कादायक बाब म्हणजे नंदिनी स्वत: एका गु्न्ह्यामध्ये तुरूंगात गेली होती. २०१७ मध्ये तिने तिच्या प्रियकराची हत्या केली होती. या प्रकरणात ती साडेचार वर्षे तुरूंगात होती आणि आता ती जामिनावर बाहेर आली होती.

अरविंदने सांगितले की नंदिनी आणि त्याचे अनैतिक संबंध होते. नंदिनीचे लग्न १० वर्षांपूर्वी कोरोना धार गावातील रहिवासी गोटीराम केवटशी झाले होते. लग्नानंतर तिचे तिच्या नवऱ्याचा मित्र छोटू केवट, निमलेश सेन आणि फिरोज खान यांच्याशीही अनैतिक संबंध होते. २०१७ मध्ये नंदिनीने तिच्या चौथ्या प्रियकरासह दातियामध्ये तिचा निमलेश सेनची हत्या केली. हत्येच्या आरोपाखाली तिने ४ वर्षे ६ महिने तुरुंगातही घालवले. २०२२ मध्ये तुरुंगातून सुटल्यानंतर ती ग्वाल्हेरला आली. येथे तिने एक पार्लर उघडले. याच ठिकाणी ती अरविंदच्या संपर्कात आली. दोघांची आधी मैत्री नंतर प्रेम झाले. त्यानंतर दोघांनी आर्य समाज मंदिरात लग्न केले.

अरविंदचे नंदिनीसोबतचे तिसरे लग्न होते. तर नंदिनीचा अरविंद हा पाचवा नवरा होता. दोघेही लग्नानंतर आपल्या कुटुंबीयांपासून दूर भांड्याने घर घेऊन राहत होते. याठिकाणी ते दोघे २ ते ३ वर्षे एकत्र राहिले. पण नंदिनीसोबत वाद होऊ लागले. वादादरम्यान नंदिनीने अरविंदविरोधात पोलिस ठाण्यात ४ तक्रारी दाखल केल्या होत्या. त्यावरून त्याच्यावर गुन्हे देखील झाले होते. संतप्त झालेल्या अरविंदने तिला कारखाली चिरडण्याचा प्रयत्न केला होता. या प्रकरणी देखील त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. अरविंदसोबत असताना देखील नंदिनीचे दुसऱ्यांसोबत अफेअर होते. त्यामुळे अरविंदने तिची हत्या केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sugar Price Hike: साखरेचे दर 18 दिवसात पुन्हा वाढले; ग्राहकांना मोठा झटका, दरात वाढ का होतेय?

Nagpur Crime: नागपूर हादरले! सैनिकी स्कूलमध्ये विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार, शाळेच्या संचालकाला अटक

Manoj Jarange Strike : मनोज जरांगेंची मोठी घोषणा, उपोषणाचं ठिकाण बदललं; बावनकुळेंनंतर आणखी एका मंत्र्यांवर गंभीर आरोप

Cyber Crime : सावधान! मोबाइलवरील जाहिरातीवर क्लिक करताच बँक अकाउंट खटाखट झालं रिकामं, काय आहे हा स्कॅम? वाचा

MNS Student Sena And ABVP Fight: साठ्ये कॉलेजबाहेर तुफान हाणामारी; मनविसे आणि ABVPचे कार्यकर्ते भिडले

SCROLL FOR NEXT