Gurugram Crime News 
क्राईम

Crime News: राक्षसी कृत्य; व्हेटिंलेटरवर असलेल्या महिलेवर लैंगिक अत्याचार

Gurugram Crime News : व्हेटिंलेटरवर असलेल्या महिलेवर लैंगिक अत्याचार झाला आहे. रुग्णालयात ही घटना घडल्याने खळबळ उडालीय.

Bharat Jadhav

गुरुग्राममधील एका नामांकित रुग्णालयात माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडलीय. रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालेल्या महिलेलावर बलात्कार झाल्याची घटना घडलीय. या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. रुग्णालयात व्हेटिंलेटरवर असलेल्या महिलेवर नराधमाने लैंगिक अत्याचार केला. विशेष म्हणजे ही घटना जेव्हा घडली त्यावेळी दोन नर्स देखील अतिदक्षता विभागात होत्या.

पीडितेच्या जबाबावरून पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध लैंगिक छळाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला एअर हॉस्टेस म्हणून काम करत असून ती मूळची पश्चिम बंगालची राहणारी आहे. ही महिला एका कंपनीत एअर होस्टेस आहे. पीडिता कंपनीच्या वतीने प्रशिक्षणासाठी गुरुग्रामला आली होती. दरबारीपूरजवळ प्रशिक्षण चालू होते. पीडिता गुरुग्राममधील सेक्टर-15 येथील एका हॉटेलमध्ये प्रशिक्षण होईपर्यंत राहत होती.

पीडित महिला हॉटेलमधील स्वीमिंगपुलमध्ये पोहण्यासाठी गेली होती. त्यावेळी तिला अचानक अस्वस्थ वाटू लागलं. त्यानंतर ती नजीकच्या रुग्णालयात दाखल झाली. महिलेची प्रकृती आणखी बिघडल्याने तिला दुसऱ्या मोठ्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. ६ एप्रिल रोजी रात्री ९ वाजता ही महिला व्हेंटिलेटरवर होती. त्यावेळी अज्ञात व्यक्तीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.

रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर ही महिला घरी आली. तेव्हा तिने तिच्या पतीला या घटेनबाबत सांगितलं. त्यानंतर १४ एप्रिल रोजी तिच्या पतीने ११२ क्रमांक डायल करुन पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. याबाबत गुरुग्राम पोलिसांनी सांगितले की, रुग्णालयातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले जातायेत. पोलीस पथक लवकरच या प्रकरणातील आरोपीची ओळख पटवून त्याला अटक करण्यात येईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raj-Uddhav Thackeray Garjana Morcha: ज्ञानेश कुमारांविरोधात ठाकरे बंधुंची 'गर्जना', आज मुंबईत मोर्चा; काँग्रेस-राष्ट्रवादीचा पाठिंबा

Monsoon Update : देशभरात पावसाने पाठ फिरवली, राज्यात ऑक्टोबर हिटने घाम फुटणार; कसे असेल आजचे हवामान? वाचा

Maharashtra News Live Update: राज ठाकरे एमपीएससी विद्यार्थ्यांची भेट घेणार

Sunday Horoscope : डोळे झाकून विश्वास ठेवू नका; 6 राशींचे भाग्य उजळणार; वाचा रविवारचे राशीभविष्य

Chanakya Niti: आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर चाणक्यांच्या 'या' 7 गोष्टी कधीही विसरू नका

SCROLL FOR NEXT