Pandharpur Crime google
क्राईम

Pandharpur Crime: मंगळवेढ्यात मठातच धर्मोपदेशकाला लोखंडी गजाने मारहाण

Crime News: मंगळवेढा तालुक्यातील सिध्दनकेरी मठात वादातून ६४ वर्षीय राचोटेश्वर शिवाचार्य स्वामीजींना लोखंडी गजाने मारहाण करण्यात आली, ज्यामुळे ते गंभीर जखमी झाले.

Dhanshri Shintre

मंगळवेढा तालुक्यातील सिध्दनकेरी येथील मठाच्या वादातून एका धर्मोपदेशकाला लोखंडी गजाने मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या मारहाणीमध्ये ६४ वर्षाचे राचोटेश्वर शिवाचार्य स्वामी गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकरणी मंगळवेढा पोलिस ठाण्यात मारहाण करणार्या सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

'मीच या मठाचा पुजारी आणि मालक, तुझा येथे काही संबंध नाही,' असे म्हणत गावातील काही गुंडांनी धर्मोपदेशकाला लोखंडी रॉड आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या घटनेत मठाच्या आतच हल्ला करण्यात आला. पोलिसांनी या प्रकरणी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे आणि पुढील तपास सुरू आहे. मारहाणी नंतरचा व्हिडिओ समाजमाध्यमात व्हायरल झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिद्धनकेरी येथील मठात राहणारे ६४ वर्षीय राचोटेश्वर शिवाचार्य स्वामीजी यांच्यावर मारहाण करण्यात आली. या प्रकरणी राजू लिंगाप्पा कोरे, मंजूनाथ सकलेश कोरे, भिमू सिध्दाप्पा कोरे, प्रमोद रेवाप्पा कोरे, संतोष रामचंद्र कोरे आणि सिध्दू येसाप्पा कोरे यांच्याविरुद्ध मंगळवेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

फिर्यादी राचोटेश्वर स्वामीजी सिध्दनकेरी येथील तोफकट्टी संस्थान मठात गेली 36 वर्षे मठपती म्हणून कार्यरत आहेत. तेथे सिद्धेश्वर मंदिर देखील आहे. स्वामीजींच्या सोबत शिष्य काशिबाई रेवणसिद्धा आणि शिवमुर्ती राचप्पा स्वामी नेहमी असतात. मठात पुजापाठासाठी आलेल्या काही स्थानिकांनी 'हा मठ आमचा आहे' असे सांगून स्वामीजी यांच्याशी वाद घातला. यामुळे तणाव निर्माण झाला आणि घटना घडली.

नेमकं काय घडलं?

३ मार्च रोजी रात्री ९.00 वाजता, सिध्दनकेरी येथील तोफकट्टी मठात राचोटेश्वर स्वामीजी झोपण्यासाठी जात असताना, आरोपींनी मठातील सीसीटीव्ही तोडले. त्यानंतर त्यांनी स्वामीजींना खोलीतून बाहेर ओढत आणून बेदम मारहाण केली. 'मीच मठाचा पुजारी आणि मालक आहे, तू बाहेरून आलास, तुझा इथे काही संबंध नाही,' असे म्हणत स्वामीजींना मारहाण केली. स्वामीजींनी आरोपींना समजावण्याचा प्रयत्न केला, तरीही त्यांनी मठातील लाईट बंद करून लोखंडी गजाने स्वामीजींना गंभीर जखमी केले. या प्रकरणी राचोटेश्वर स्वामीजींनी पोलिसात तक्रार दाखल केली, त्यानंतर सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: कर्जतच्या टोरंट प्रकल्पाविरोधात शेकाप आक्रमक; वृक्षतोड थांबवण्याची मागणी

Pune : पुण्यात खळबळ! रिसॉर्टवरील देहविक्रीचा पर्दाफाश; १००० रुपयांमध्ये महिलांकडून वेश्याव्यवसाय

Boiled egg storage: उकडलेली अंडी किती दिवस फ्रिजमध्ये सुरक्षित राहू शकतात?

Toilet Paper : टॉयलेट पेपरचा अतिवापर पडेल महागात, होऊ शकतात 'हे' ५ गंभीर आजार

Volvo EX90: एका सेकंदात १०० किमीचा स्पीड, एका चार्जमध्ये ७२५ किमीची रेंज; Volvoची दमदार कार लॉन्च

SCROLL FOR NEXT