Teacher Brutally Attacked by Local Goon Over Daughter Saam Tv
क्राईम

Beed Crime: बीडमध्ये पुन्हा गुंडाराज! 'तुमची मुलगी मला द्या', गावगुंडाकडून शिक्षकाला बेदम मारहाण; प्रकृती चिंताजनक

Teacher Brutally Attacked by Local Goon Over Daughter: बीडमध्ये शिक्षकावर शाळेबाहेरच प्राणघात हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एकतर्फी प्रेमातून तरुणाने मुलीच्या वडीलांवर हल्ला केला.

Priya More

योगेश काशिद, बीड

'तुमची मुलगी मला द्या' म्हणत बीडमध्ये एका शिक्षकाला गावगुंडाने बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बंदुकीचा धाक दाखवत तरुणाने शिक्षकाला मारहाण केली त्यानंतर त्यांच्या कारवर ट्रॅक्टर घातलं. जखमी शिक्षकावर बीडमधील एका खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. एकतर्फी प्रेमातून हा संपूर्ण प्रकार घडला असल्याचा आरोप शिक्षकाच्या नातेवाईकांकडून करण्यात आला आहे. या घटनेमुळे पुन्हा बीडमध्ये खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बीडच्या केज तालुक्यातील वरपगाव येथील एका विद्यालयासमोर हा धक्कादायक प्रकार घडला आहे. 'तुमची मुलगी मला द्या' म्हणत शिक्षकाला शाळेबाहेर एका गावगुंडाने जबर मारहाण केल्याची घटना घडली. विशेष म्हणजे हा सर्व प्रकार बंदुकीच्या धाकावर करण्यात आला, असा आरोप या शिक्षकाच्या नातेवाईकांनी केला आहे. या शिक्षकावर कुऱ्हाड आणि कोयत्याने वार करण्यात आले. यानंतर आरोपीने या शिक्षकाच्या कारवर ट्रॅक्टर घालत मोठे नुकसान देखील केले.

बाजीराव डोईफोडे असे गावगुंडाच्या हल्ल्यात जखमी झालेल्या शिक्षकाचे नाव आहे. या हल्ल्यात शिक्षक गंभीर जखमी झाला असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. या शिक्षकावर सध्या बीडमधील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणात अद्याप पोलिसात गुन्हा दाखल झालेले नाही. या घटनेमुळे बीडमध्ये पुन्हा एकदा दहशतीचे वातावरण असून गावगुंडांना पोलिसांचा धाक राहिला आहे की नाही असा संतप्त सवाल नागरिकांकडून विचारला जात आहे.

आरोपी तरुण हा शिक्षक आणि त्याच्या कुटुंबीयांना वारंवार त्रास देत होता. रस्ता आडवून धमक्या देखील देत होता. 'तुमची मुलगी मला आवडते. ती मला द्या.' असे तो वारंवार या शिक्षकाला म्हणत होता. आज त्याने शिक्षकाच्या कारला ट्रॅक्टरने धडक देत नंतर शिक्षकावर प्राणघातक हल्ला केला. एकतर्फी प्रेमातून आरोपीने हे सर्व कृत्य केले आहे. 'आरोपीला एका तासांच्या आतमध्ये पकडा नाही तर आम्ही पेट्रोल अंगावर टाकून जाळून घेऊ.', असा इशारा शिक्षकाच्या नातेवाईकांनी केला दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Belly Fat: पोटाची चरबी वाढलीये? फॉलो करा 'या' सोप्या टिप्स, पोटाचा घेर होईल कमी

Akola News: बापरे! महिला 50% होरपळली; एकनाथ शिंदेंचा थेट पोलीस अधीक्षक आणि माजी आमदारांना फोन; नेमकं काय आहे प्रकरण?

शेतकरी पाण्यात, जिल्हाधिकारी मग्न नाचगाण्यात, जिल्हाधिकाऱ्याचा प्रताप, नागरिकांचा संताप

Damage Lungs: खराब फुफ्फुसांचे आरोग्य सुधारण्यासाठी खा 'हे' पदार्थ, ठरतील गुणकारी

India vs Pakistan Final: आशिया कप फायनलमध्ये भारत- पाकिस्तान पुन्हा आमने सामने

SCROLL FOR NEXT