Crime Saam tv
क्राईम

Crime : फिरायला गेले, मैत्रिणीने लग्नास नकार दिला, संतापलेल्या तरूणाने चाकूने सपासप वार केले

Akola Crime News : लग्नास नकार दिल्यामुळे तरुणानं मैत्रिणीवर चाकूने हल्ला केला. जखमी तरुणीवर उपचार सुरू असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.

Namdeo Kumbhar

अक्षय गवळी, अकोला प्रतिनिधी

Akola Crime News : लग्नाचा प्रपोज नाकारल्याने तरुणीवर चाकू हल्ला केल्याची घटना अकोल्यात घडली आहे. 25 वर्षीय तरुणानं 22 वर्षीय वैद्यकीय नर्स असलेल्या तरुणीवर चाकूने हल्ला केला. जखमी तरूणीवर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. संतोष डिवरे असं चाकू हल्ला करणाऱ्या तरुणाचं नाव आहे. बोरगाव पोलिसांनी त्याला अटक केली असून पुढील तपास सुरु आहे. अकोल्यातल्या बोरगाव पोलीस स्टेशन हद्दीतील सोनाळा रस्त्यावर ही घटना घडली.

संतोष डिवरे आणि जखमी तरुणी हे दोघे चांगले मित्र आहेत. दोघे जण बोरगाव मंजू परिसरात फिरायला गेले होते. याच दरम्यान संतोषने तरुणीसमोर लग्नाचा प्रपोज ठेवला. मात्र तरुणीने स्पष्ट नकार दिल्याने दोघांमध्ये वाद झाला, आणि याच वादादरम्यान तरुणाने त्याच्या जवळील चाकूने हल्ला केला. या घटनेत तरुणी गंभीर स्वरूपात जखमी झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे.

संतोष डिवरे आणि जखमी तरूणी गेल्या अनेक दिवसांपासून एखमेंकांना ओळखतात. दोघांमध्ये चांगली मैत्री होती. डिवरे यानं तरूणीला लग्नासाठी प्रपोज केले. त्यावेळी तरूणीने त्याला नकार दिला. त्यानंतर दोघांमध्ये तू तू मैं मैं सूरू झाले. दोघांमधील बाचाबाचीचे रूपांतर वादात झाले. संतापलेल्या तरूणाने चाकून सपासप वार केले. तरूणीच्या पोटातही चाकूहल्ला केला. हल्ल्यामध्ये तरूणी गंभीर जखणी झाली असून रूग्णालयात उपचार सुरू आहेत. सद्यस्थितीत तरुणीची प्रकृती स्थिर आहे. पण या घटनेने अकोला जिल्हा हादरून गेलाय.

पोलिसांनी काय माहिती दिली...?

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार संतोष प्रकाश डिवरे (वय २५ रा जवळा तालुका शेगाव) हा एका २२ वर्षीय युवतीला आपल्या कार क्रमांक एम एच 24 व्ही 9926 मधून सोनाळा रोडवर घेऊन आला होता. दरम्यान सदर युवती व युवक यांच्यामध्ये शाब्दीक वाद झाल्याचे समजते. वादानंतर सदर युवकाने युवतीवर धारदार चाकूने पोटात वार करून प्राणघातक हल्ला केला. या घटनेत युवती गंभीर जखमी झाली. सदर घटनेची माहिती मिळताच ठाणेदार अनिल गोपाळ यांच्यासह बोरगाव मंजू पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घटनेतील आरोपी पसार होण्याच्या बेतात असताना ताब्यात घेतले तर गंभीर जखमी युवतीवर उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monsoon Update : मान्सून लांबणीवर, पण राज्यात आज वादळी पावसाची शक्यता; जाणून घ्या हवामानाचा अंदाज

IPL फायनल हरल्यानंतर गुजरात टायटन्ससोबत मोठी दुर्घटना; भररस्त्यात टीमच्या बसला लागली आग, उडाली एकच खळबळ

MLC Election : ठाण्यात एकनाथ शिंदेंची मोठी खेळी, विश्वासू उमेदवाराला मैदानात उतरवले

Vasai-Virar Tourism : रिमझिम पावसात समुद्रकिनारी चिंब भिजा, हिरव्यागार निसर्गाच्या सान्निध्यात वसईत लपलंय 'हे' सुंदर ठिकाण

Famous Actress : बेडरूम अन् इंटीमेट सीन; कट म्हटलं तरी हिरोला Kiss करत राहिली प्रसिद्ध अभिनेत्री, नेमकं घडलं काय?

SCROLL FOR NEXT